फोटो सौजन्य - IndianPremierLeague
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडीयन्स सामन्याचा : क्वालिफायर 2 चा सामना पार पडला या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळाली. श्रेयस अय्यरच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या संघाने पहिले फलंदाजी करत ६ विकेट्स गमावून २०३ धावा केल्या होत्या. पंजाबच्या संघाने बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात निराशाजनक फलंदाजी केली होती पण २०३ धावांचे लक्ष्य क्वालिफायर २ च्या सामन्यात संघाने कॅप्टन श्रेयस अय्यरच्या जोरावर सहज पार केले. कालच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला पंजाब किंग्सच्या संघाने ६ चेंडू शिल्लक असताना ५ विकेट्सने पराभूत केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यात खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
पंजाब किंग्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर संघाने पहिले दोन विकेट्स लवकर गमावले होते. संघाचं सलामीवीर फलंदाज प्रभसिमरण सिंह आणि प्रियांश आर्या हे दोघे लवकर पॅव्हेलियनमधे गेले होते. प्रभसिमरण सिंह याने मुंबई इंडियन्सविरुद्ध ९ चेंडू खेळले आणि ट्रेंट बोल्ट याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. प्रियांश आर्या याने संघाला फक्त २० धावांची खेळी खेळली आणि त्यानंतर अश्वनी कुमार याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. कालच्या सामन्यामध्ये संघाचा फलंदाज जोस इंग्लिश याने प्रभावशाली खेळी खेळली. त्याने २१ चेंडूमध्ये ३८ धावा केल्या यामध्ये त्याने २ षटकार आणि ५ चौकार मारले. जोस इंग्लिश याने पहिल्याच ओव्हर मध्ये बुमराहला देखील मोठे शॉट मारले.
पहिले तीन विकेट्स पंजाबच्या संघाने गमावल्यानंतर संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा या दोघांची चांगली भागीदारी पहायला मिळाली. नेहल वढेरा याने संघांसाठी २९ चेंडूमधे ४८ धावा केल्या. तर कालच्या सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर याने संघासाठी कौतुकास्पद कामगिरी केली. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध ४१ चेंडूमध्ये ८७ धावा करून नाबाद राहिला. यामध्ये त्याने ८ षटकार आणि ५ चौकार मारले. शशांक सिंग काल फेल ठरला आणि तो धावबाद झाला.
What it means to reach the 𝗙𝗜𝗡𝗔𝗟! ❤️
𝙍𝘼𝙒 𝙀𝙢𝙤𝙩𝙞𝙤𝙣𝙨 from the #PBKS camp after a magnificent win in Ahmedabad 🤩#TATAIPL | #PBKSvMI | #Qualifier2 | #TheLastMile | @PunjabKingsIPL pic.twitter.com/p0gXuPZLQL
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
या विजयासह आता पंजाब किंग्सच्या संघाने ११ वर्षानंतर आता फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबचा संघ आयपीएलच्या इतिहासामध्ये फक्त ३ वेळा फायनलमध्ये स्थान पक्के करण्यात यशस्वी झाला आहे. फायनलचा सामना हा ३ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही त्यामुळे जो संघ या सीझनमध्ये विजयी होईल तो संघ पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी नावावर करणार आहे.