राजनाला कालव्याचे पाणी सावळे गावाच्या शिवारात ; शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याच्या तत्परतेबद्दल मानले आभार
कर्जत /संतोष पेरणे: तालुक्यातील पूर्व भाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्याचे पाणी आपल्याला दुबार शेतीसाठी मिळावे अशी मागणी सावळे गावातील शेतकरी अनेक वर्षे करीत आहेत.राजनाला प्रकल्पातील मांडवणे कालव्याचे पाणी गेली 12 वर्षे हेदवली गावाच्या पुढे असलेल्या सावळे गावाच्या शिवारातील 30 शेतकऱ्यांना मिळत नाही. सावळे परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर पाटबंधारे विभागाने अगदी 15 दिवसात कार्यवाही केली असून सावळे शिवारात राजनाला कालव्याचे पाणी डवरु लागले आहे.
कर्जत तालुक्यातील पूर्व भागातील 40गावांमधील जमीन ओलिताखाली यावी, यासाठी राजनाला कळवा बांधण्यात आला आहे. 2012 मध्ये राजनला कालवामध्ये कालवे सिमेंट काँक्रिटचे करण्यासाठी कालव्यातून दिले जाणारे पाणी बंद झाले. त्यानंतर 2024 मध्ये राजनालामधील मांडवणे कालव्यात पाणी सोडले गेले आणि ते पाणी सावळे गावापर्यंत येऊन थांबले आहे. सावळे गावाच्या हद्दीत पाणी पोहोचले नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे आणि भाताची शेती करता यावी, यासाठी या वर्षी नाही तर पुढील वर्षी भाताची शेती उन्हाळ्यात करता यावी म्हणून राजनाला कालव्याचे पाणी मिळावे, अशी मागणी सावळे गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सावळे गावातील शेतकरी गंगाराम भालके, लक्ष्मण भालके, भानुदास धुले, गणपत महादेव धुले, खंडू काशिनाथ धुले, मारुती अर्जुन धुले, मोतीराम भिका धुले, रमेश दळवी, भालचंद्र दळवी, सदू गोविंद धुले, रघुनाथ धुले, वासुदेव धुळे, बजरंग धुले, शिवराम धुले, अमृता धुले, नारायण धुले, काळूराम कोंडीलकर, पांडुरंग कोंडिलकर, लक्ष्मण लोभी, पांडुरंग कृष्णा धुले, चैतन्य धर्मेंद्र धुले, गुरुनाथ पंढरीनाथ धुले, असे अनेक शेतकरी उन्हाळी दुबार शेती करून पीक घेत आहेत. दोन वर्षांपासून हेदवळी गावापर्यंत पाणी येत आहे; पण पुढे नाल्याचे काम न केल्यामुळे सावळे ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. पाणी मिळून शेती लागवडीखाली आणण्याची त्यांची इच्छा आहे असल्याच्या भावना पाटबंधारे खात्याचे उप अभियंता अमित पारधे यांच्याकडे व्यक्त केली होती.
सावळे गावातीलशेतकऱ्यांची दुबार शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी केली जाणारी मागणी पाटबंधारे विभाग तात्काळ मान्य केली.मांडवणे कालव्याचे पाणी हेदवली हद्दीपर्यंत पोहचत होते आणि पुढे पाणी सोडण्यासाठी किरकोळ कामे करण्यासाठी आपल्या शाखा अभियंता यांना आदेश दिले. स्वतः कालव्याच्या ठिकाणी उभे राहून हेदवली येथून पाणी पुढे जावे यासाठी सर्व कार्यवाही केली आणि सावळे गावापर्यंत राजनाला कालव्याचे पाणी पोहचवण्याचे उद्दिष्ट यशस्वी झाले.त्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सावळे गावातील शेतकरी भालचंद्र दळवी आणि सदू गोविंद धुळे यांच्या शेतात पाणी सोडले गेले. ते पाणी पुढे गंगाराम भालके आणि लक्ष्मण भालके यांच्या शेतातून शिवारात पोहचले.
यावेळी शेतकरी गंगाराम भालके लक्ष्मण भालके भानुदास धुले, गणपत धुले खंडू धुळे मारुती धुळे मोतीराम धुले रमेश दळवी भालचंद्र दळवी सदू धुळे रघुनाथ धुले वासुदेव धुले बजरंग धुले शिवराम धुले अमृता धुले नारायण धुले,काळूराम कोंडिलकर,पांडुरंग कोंडिलकर, लक्ष्मण लोभी पांडुरंग धुले चैतन्य धुले गुरुनाथ धुले हे शेतकरी उपस्थित होते. पाणी आपल्या शिवारात जात असल्याचे पाहून सावळे गावातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याचे आभार मानले असून तब्बल एक तपानंतर शेतात पाणी आले होते.
गंगाराम भालके, शेतकरी
यावर्षी लेट पाणी आल्यामुळे कोणीही शेती करणार नव्हते पण पुढच्या वर्षी दुबार शेती करण्याची सावळे गावातील शेतकऱ्यांची इच्छा प्रबळ होती. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी पाठपुरावा करीत होतो. शेवटी पाटबंधारे विभागाने पुढच्या वर्षी काय? याच वर्षी पाणी सावळे गावाच्या शिवारात येईल असे आश्वासन दिले होते.त्यानुसार पाणी आल्याने आम्ही आनंदी असून पुढील वर्षी आम्ही सर्व शेतकरी दुबार शेती करणार आहोत.
अमित पारधे, उप अभियंता पाटबंधारे
सावळे गावात राजनाला कालव्याच्या दुरुस्तीचे कामाला सुरुवात झाला तेंव्हापासून पाणी जात नव्हते. यावर्षी हेदवली भागात राजनाला प्रकल्पातील मांडवणे कालव्याचे पाणी पोहचले होते. त्यामुळे सावळे गावातील शेतकऱ्यांना आपल्या भागात 2026 मध्ये दुबार शेती करण्यासाठी पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आम्ही साकारातमक विचार करून पुढच्या वर्षीचा विचार न करता याचवर्षी पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि सावळे शिवारात पाणी गेले आहे.