कर्जत / संतोष पेरणे : राखीव वनांचं संरक्षण व्हावं हा हेतू राखत माझे वन या संकल्पनेचा शुभारंभ मंत्री गणेश नाईक यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी वनसंरक्षण ही आपली जबाबदारी अशी मत त्यांनी व्यक्त केलं आहे. वनविभाग मंत्री गणेश नाईक म्हणाले की, मी वन विभागाचा मंत्री असलो तरी मी स्वतः विश्वस्त म्हणून समजतो.महाराष्ट्र वन विभागाचे नाव जगात अग्रेसर राहिले पाहिजे यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. आपल्या सभोवताली असलेले जंगल वन विभागाचे आहे पण ते जंगल तुमचे आमचे असून हे राखण्याचे जबाबदारी आपली सर्वांची असावी अशी भूमिका राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी ठामपणे मांडली. कर्जत येथील माथेरान वन क्षेत्रपाल कार्यालय आणि शेलू येथील तपासणी नाका यांचे उद्घाटन मंत्री महोदय यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.दरम्यान माझे वन या संकल्पनेचा शुभारंभ मंत्री गणेश नाईक यांचे हस्ते करण्यात आला.
कर्जत तालुक्यातील माथेरान येथील वन क्षेत्रपाल कार्यालय आणि वनोपज तपासणी नाका यांचे उद्घाटन राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांचे हस्ते झाले. त्यावेळी कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे,प्रांत अधिकारी प्रकाश संकपाल,राज्याचे प्रधान सचिव वन बाल प्रमुख शोमिता विश्वास,मुख्य वन संरक्षक ठाणे के प्रदिपा, उप वन संरक्षक राहुल पाटील तसेच संकल्प नाईक, पनवेल माजी नगराध्यक्ष सुनील घरत,भाजप पदाधिकारी किरण ठाकरे,मंगेश म्हसकर,राजेश भगत,नरेश मसणे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात जगातील दर्जाच्या ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र नागाव ग्रामपंचायत यांची नोंदणी झाली आहे त्याची एम ओ यू करीत आहोत.एआय बद्दल युनिव्हर्सल बिझनेस स्कूल बरोबर तंत्रज्ञान साठी एम ओ यू करीत आहोत.
वन कर्मचारी एक एकर स्वतःचे श्रमदानातून स्वतः झाडे लावतील आणि त्यातून वन कर्मचारी यांनी माझे वन संकल्पना राबविली जाणार असून 338 एकर क्षेत्र मध्ये हा प्रयत्न केला जाणार आहे.वन निवासी कळकराई आणि वाघिणीवाडी यांना वन जमिनीतील रस्त्यांसाठी सनद देण्यात आली.तसेच ए आय करार हा युनिव्हर्सल बिझनेस स्कूल आणि वन विभाग यांच्यात सामंजस्य करार यावेळी झाला. तर ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र नागाव ग्रामपंचायत म्हणून वन विभागाने सामंजस्य करार यावेळी मंत्री महोदय यांच्यासमोर करण्यात आला.
राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी पुढे बोलताना वन विभाग माझ्यासाठी नवीन नाही,त्यावेळी माझ्याकडे पर्यावरण हे खाते देखील होते.जागतिक बँकेचे कर्ज मंजूर झाले होते पण जमीन उपलब्ध नव्हती.वन जमिनीत झाडे लावावी यासाठी वन कर्मचारी यांना रिव्हॉल्वर तसेच फिरायला जिप्सी दिल्या आणि अशी वाहने देण्याची माझी भूमिका होती. वायरलेस माझ्या काळात देण्याचे माझे कार्यकाळात झाले.माझे या विभागवार विशेष प्रेम असून मी खाते समजून घेतले आणि दोन दिवस प्रशिक्षण देवून ब्रिटिश काळात पोलिसांना होता,तसा सन्मान आणि अधिकार वनपाल यांना होता.
पूर्वी डोंगर जळते तरी लोक धावत नाही याचे कारण आग विझावयाला पुढे जायचे आणि त्यातून संयुक्त वन व्यवस्थापन ही योजना माझ्या कार्यकाळात सुरू झाली.त्यातून जंगले वाढली पाहिजे यासाठी प्रत्येक वन क्षेत्रात सुरंगी ची झाडे लावा तसेच एक झाड 100 एकर जागेला सुगंध देतो.कर्जत माथेरान येथील नवीन इमारतीच्या समोरील जुन्या इमारत उभी करावी अशी सूचना केली.बहाडोली या जांभळाचे जातीची प्रत्येक रेंज मध्ये 100 एकर मध्ये झाडे लावा अशी सूचना केली असून या योजनेची अंमलबजावणी तत्काळ करावी अशी सूचना गणेश नाईक यांनी केली.पारंपरिक रस्ते आहेत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अडथळे वन विभाग आणणार नाही आणि ते रस्ते डांबरीकरण केले जाईल
वन उद्यान होईल..
महेंद्र थोरवे यांनी वन उद्यान मागितले असून कर्जत तालुक्यात असे वन उद्यान उभे राहील आणि त्यासाठी लागणारी निधी द्या अशी यावेळी जाहीर केले.
वन क्षेत्र वाढविणार..
वन जमीन 21 टक्के असून माझ्या काळात पाच टक्के जमीन वाढवली जाईल असे शब्द दिला असून वन खात्यात बदली करण्यासाठी माझ्याकडे थेट या आणि कोणाचीही मध्यस्थी करू नका अशी सूचना वन कर्मचारी यांना केली.
नोकऱ्यांना प्राधान्य..
मोरबे धरण मधील प्रकल्प ग्रस्त यांना नोकऱ्या देण्यासाठी माझा पुढाकार असून भविष्यात पोशीर धरण होत असून त्यांना देखील आम्ही नवी मुंबईत नोकरी देणार आहोत असे आश्वासन दिले.
कर्जत तालुक्यासाठी स्वतंत्र पाण्याचे धरण व्हावे..
कर्जत आणि नेरळ या वाढवणाऱ्या वस्तीसाठी पाण्याची स्वंतत्र व्यवस्था करावी अशी सूचना मंत्रिमंडळ बैठकीत केली असून शासनाने त्याची नोंद घेतली आहे असे गणेश नाईक यांनी जाहीर केले.या सर्व भागात महापालिका व्हायला हवी यासाठी देखील शासनाने विचार व्हायला हवी.
आमदार महेंद्र थोरवे यांनी सुंदर इमारत उभी असताना माथेरान परिक्षेत्र हे मोठे वन क्षेत्र असताना वन विभाग यांचे कौतुक केले पाहिजे.कर्जत तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्य फुलले असून त्यात वन विभागाचा वाटा मोठा आहे.या ठिकाणी कोणत्याही औ्योगिकीकरण नाही पण पर्यटन यांचे माध्यमातून आम्ही पर्यावरण राखण्याचे काम आहोत.वन वणवा ही मोठा समस्या असून ती रोखण्यासाठी प्रयत्न होईल अशी अपेक्षा आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली.वनमंत्री गणेश नाईक यांनी हरित महाराष्ट्र आणि आता त्यांच्याच माध्यमातून माझे वन ही संकल्पना यशस्वी होईल अशी खात्री व्यक्त करतो.कर्जतचे विकासात काम करीत असताना वन विभागाचे आणि वन मंत्री यांची साथ महत्वाची आहे.कर्जत मध्ये एका मोठ्या क्षेत्रात वन उद्यान बनवावे अशी मागणी महेंद्र थोरवे यांनी केली.राज्यमार्ग 76 वरील काही ठिकाणी वन विभागाने रस्त्यांची कामे थांबली आहेत.कर्जत हे ग्रीन कर्जत हब व्हावे यासाठी कर्जत मध्ये सुंगांधी झाडे लावावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
वन विभागासाठी पश्चिम घाट महत्वाचा.. शोमिता विश्वास
वन विभागाच्या राज्याचे प्रधान वन बल प्रमुख शोमीता विश्वास यांनी यावेळी बोलताना जगात एक पश्चिम घाट म्हणून प्रसिद्ध असून खूप प्रकारच्या प्रजाती मधील वृक्ष आणि प्राणी या ठिकाणी आहेत. त्यामुळे आम्ही जबाबदारी स्वीकारून या भागात वन संरक्षण करण्याची कामे करीत आहोत.वन संरक्षण समिती यांचा जंगल राखण्यासाठी मोठा सहभाग राहिला असून वन रोखणे आमच्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून ए आय तंत्रज्ञान घेवून वन वणवे रोखण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो.माझे वन ही संकल्पना भविष्यात संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी वन विभाग काम करील असे आश्वासन शोमिता विश्वास यांनी दिले.
सुरुवातीला उपवन संरक्षक राहुल पाटील यांनी प्रास्ताविक करताना 2000 सालाची जुनी इमारत होती, तपासणी नाका शेलू येथे इमारतीचे उद्घाटन असून रायगड जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्र वन जमीन 338 हे कर्मचारी कार्य करीत आहेत. गावांना रस्ते उपलब्ध होत नाही त्यांना वन कळकराई आणि वाघिणीची वाडी यांना रस्त्यासाठी जमीन दिल्याबद्दल सनद देण्यात आली.
@santosh perne