Raigad News: रायगड जिल्ह्यात भुकंपाचे सौम्य हादरे ; नेमका प्रकार काय ?
अलिबाग वार्ताहर: भुकंपाचे सैम्य झटके जाणवू लागल्याने पेण आणि परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. तालुक्यातील तिलोरे व सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी, कलाकाराई, भोप्याची वाडी, कवेले वाडी येथे भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याची घटना घडली. काल रात्री 11.30 ते 12.30 वाजताच्या दरम्यान भुकंपाचे सौम्य झटके जाणवल्याने नागरिकांनी स्थानिक प्रशासनास कळविले होते. सदर घटना भूकंप नसून याबाबत भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार येत आहे. असं जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Raigad News: माजी आमदाराचे कर्जत पोलीस ठाण्यासमोर आंदोलन,नेमकं प्रकरण काय ?
या घटनेची भारतीय हवामान विभाग मुंबई (IMD) नुसार तसेच कोयनानगर जि.सातारा येथील भूमापन केंद्र येथे भूकंपाची नोंद झाली नसल्याचे आढळून आले आहे.या ठिकाणी तहसिलदार सुधागड यांनी पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला आहे. सदर घटनेत काही घरांचे किरकोळ नुकसान झाले. मात्र सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही.या ठिकाणच्या अधिक सर्वेक्षणासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांना सदर ठिकाणी सर्वेक्षण करण्यास विनंती करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
Pune News: पुण्याला हक्काचे पाणी कधी मिळणार? महापालिकेची मागणी जलसंपदा विभाग ऐकणार? वाचा सविस्तर
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री दोन्ही गावांना भेट दिली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. गावकऱ्यांना पुन्हा धक्के जाणवल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्राच्या भूकंपमापकावर तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात असलेल्या भूकंप मापक यंत्रावर या धक्क्यांची कुठलीच नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हाप्रशासनानाला देण्यात आली आहे. मात्र तरिही खबरदारी म्हणून पुण्यातील भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेला या गावांची पहाणी करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.
दरम्यान भूकंपासारख्या धक्यामुळे तसेच भूगर्भातून येणाऱ्या आवाजांमुळे गावकरी चांगलेच धास्तावले होते. कालची रात्र भीतीच्या सावटात बसून काढली आहे.त्यामुळे या प्रकारांचा लवकरात लवकर शोध लावा, अशी विनंती गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.