मुंबई : राज ठाकरेंवर दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कलम ११६, ११७, १३५ आणि १५३ अ अंतर्गत औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राज ठाकरेंना अटक होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान या प्रकरणी इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इम्तियाज जलील म्हणाले, भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्री देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नाहीत का? फक्त दाखवण्यासाठी राज ठाकरेंवर कारवाई नको. राज ठाकरेंना सहज जामिन मिळेल अशी कलमं दाखल केली आहेत. आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी ही कलमे लावली आहेत. राणांप्रमाणे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला नाही? पोलिसांनी अशी थातूर मातुर कलमं का केली?, असा थेट सवाल त्यांनी महाविकास आघाडीला विचारला आहे.
[read_also content=”कोळी बांधवांच्या प्रश्नांवर सरकारकडे पाठपुरावा करणार; राज्यपाल कोश्यारी यांचे कोळी महिलांना आश्वासन https://www.navarashtra.com/maharashtra/koli-will-follow-up-with-the-government-on-the-issues-of-the-brothers-governor-koshyaris-assurance-to-koli-women-nrdm-275743.html”]
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत भाषण सुरु असताना, मध्येच अजान वाजलं होत. यावर संतापून राज ठाकरे म्हणाले, “जर हे सभेच्य वेळेला भांग देणार असतील, भांग सुरु करणार असतील तर आपण आताच्या आता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. जर यांना सहज आणि सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, मला माहिती नाही. पोलिसांनी आताच्या आता जाऊन हे बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ देत. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही, हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून जर समजात नसेल, महाराष्ट्राचं मनगटात काय टाकत आहे हे यांना दाखवावंच लागेल. माझी पोलिसांना विनंती आहे की, या लोकांची थोबाडं बंद करा. माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की, मागचा पुढचा विचार करू नका. हे भोंगे उतरवले गेले पाहिजेच. अभी नही तो कभी नही.” या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.