राजू पाटील यांनी मंत्री अदिती तटकरेंकडे का केली अशी मागणी?
raju patil on aditi tatkare: डोंबिवलीतील एका स्मशानभूमीत लहान मुले लाकडे वाहून नेत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हीडीओ समोर आल्यावर शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्यात येईल असे सांगितले आहे. तर मनसेने नेते राजू पाटील यांनी या लहानग्याच्या नाजूक भविष्याची राख होऊ नये यासाठी स्थानिक प्रसाशनाने तातडीने या गंभीर प्रश्नाची सखोल चौकशी करावी. या मुलांचे बालपण सुरक्षित करावे ही कळकळीची मागणी केली आहे. या संदर्भातील ट्वीट मंत्री आदिती तटकरे आणि केडीएमसी प्रशासनाला केले आहे.
डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशान भूमीत दोन लहान मुले लाकडे वाहून नेण्याचे काम करीत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डोंबिवलीकरांमध्ये आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना राग आला. जेव्हा व्हीडीआेची तपासणी केली गेली. तेव्ही ही मुले कंत्राटदाराची असल्याची बाब समोर आली. या लहान मुलांकडून असे काम करुन अयोग्य आहे. या मुलांकडून लाकडे उचलली जात नाही. ते जबरदस्तीने कशीबशी लाकडे उचलताना दिसत आहे. हा व्हीडीओ समोर आल्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, डोंबिवलीतील रामनगर स्मशानभूमीत बालमजुरीचे विदारक आणि हृदयद्रावक दृश्य सध्या सोशल मीडियावर दिसत आहे. लहान वयात सरणासाठी लाकडे उचलणाऱ्या निष्पाप मुलांना पाहून मन सुन्न झाले आहे.
डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत बालमजुरीचे विदारक आणि हृदयद्रावक दृश्य सध्या सोशल मीडियावर दिसत आहे. लहान वयात सरणासाठी लाकडे उचलणाऱ्या निष्पाप मुलांना पाहून मन सुन्न झाले आहे.
‘बालपण देगा देवा’ असे आर्तपणे परमेश्वराला विनवणारे संत तुकाराम याच महाराष्ट्रात होऊन गेले आणि आज याच… pic.twitter.com/6Pm6Y0kstq— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 26, 2025
‘बालपण देगा देवा’ असे आर्तपणे परमेश्वराला विनवणारे संत तुकाराम याच महाराष्ट्रात होऊन गेले आणि आज याच भूमीत बालकांना त्यांच्या बालपणीच इतके कष्ट सोसावे लागत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. देशात बालमजुरीविरोधात कठोर कायदे अस्तित्वात असतानाही, या चिमुकल्यांना स्मशानात काम करावे लागत आहे, हे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचे आणि अपयशाचे जिवंत उदाहरण आहे.
या लहानग्यांच्या नाजूक भविष्याची राख होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि या मुलांचे बालपण सुरक्षित करावे, ही कळकळीची विनंती आहे. या व्हिडिओ समोर आल्यावर शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की, संबंधित कंत्राटदाराचा ठेके रद्द करण्यात यावा असे केडीएमसी प्रशासनाला सांगितले आहे, असं ट्विट राजू पाटील यांनी केलं आहे.