६५ बेकायदा इमारत प्रकरणात राजू पाटील यांची टीका
कल्याण- डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या गैरव्यवहारात कल्याण प्रांत कार्यालयाची देखील फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या इमारतींसाठी खोटे सातबारा उतारे आणि बनावट नकाशे वापरण्यात आल्याचे चौकशीत समोर आले असून याप्रकरणी कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी रामनगर पोलिसांना खोटे कागदपत्र बनवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याचदरम्यान आता मनसेचे नेते राजू पाटील यांनीही भाष्य केलं असून ६५ इमारतींची नावे काढा. जे तळी उचलून धरतात. त्यांच्या ही दोन तीन इमारती आहेत. नुसते राजकारण करण्यासाठी हे बोलणे योग्य नाही. यांच्याच सत्ता काळात या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. लोकांच्या जीवावर राजकारण केले जात आहे. यांच्या भांडणात लोकांची घरे तुटतील. लोकांची घरे वाचली पाहिजे. त्यांच्यासाठी योजना आणली पाहिजे. अशा गोष्टीवर त्यांनी बोलायला पाहिजे. त्यांचे राजकीय इसपित साध्य होईल. लोकांच्या हाती काही मिळणार नाही अशी टिका मनसेचे नेते राजू पाटील यांनी करीत उद्धव सेनेला टोला लगावला आहे.
कल्याण- डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणात संबंधित बिल्डरांनी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे खोटे शिक्के, अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या वापरून बनावट कागदपत्रे सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवल्याचे उघड झाले होते. या इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यावर राजू पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, घेसरच्या ठिकाणी रस्ता तयार केला जात आहे. तो बिल्डरांच्या फायद्यासाठी केला जात आहे. हे फक्त पैसे काढण्यासाठी रस्ते आहेत. बिल्डरांच्या भल्यासाठी रस्ते केले जात आहे. जिथे रस्ते करायलाय वाव आहे तिथेही गडबड आहे. या रस्त्यांचे ऑडिट करावे. या रस्ते कामात शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे.
लोकांना त्रास होत असेल तर लोकांनी उतरले पाहिजे. निळजेची गुरचरण जमीन मेट्रो कार शेडकरीता दिली. बुलेट ट्रेनच्या धर्तीवर या बाधितांना भरपाई दिली पाहिजे याकडे मनसेने नेते राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे.रेती उपसा करणाऱ्यावर एक दोन वेळा कारवाई होते. सरकारी बाबू लोक आणि संगनमताशिवाय आहे. पूर्वीचे सत्ताधारी आणि आत्ता विरोधात असलेल्यांचा हा धंदा आहे. एकदोन वेळा कारवाई होते. हा केवळ कारवाईचा फार्स आहे असे मनसेने नेते राजू पाटील यांनी सांगितले.