महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी कंबर कसली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह राज ठाकरे देखील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या प्रचारासाठी दापोली विधानसभा मतदारसंघातील केळशी, आसोंड, तेरेवायंगणी, पाजपंढरी या भागात सभा पार पडणार आहे. या सभेला शिवसेनेचे नेते रामदास कदम हे देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी आहे का? आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) नाव बलात्काराच्या गुन्ह्यात पुढे आले तेव्हा तुम्ही पंतप्रधानांना मागच्या दाराने गुपुचूप भेटायचे आणि आता त्यांनाच शिव्या देत आहेत, असे म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मला काँग्रेससोबत जायची वेळ तेव्हा माझे दुकान बंद करून टाकेन असे सांगितले होते. मात्र नालायक उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. देशाच्या पंतप्रधानांना ते शिव्या घालत आहेत. लाज वाटत नाही का? स्वतःच्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद उद्धव ठाकरे आहेत, असे म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलायला नको
मातोश्री आमचं दैवत आहे. विजयी उमेदवाराची माँसाहेब आरती करायच्या. आता काय चालू आहे मातोश्रीमध्ये? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी आहे का? कोणीतरी बोलताय सूर्याकडे बघून थुंकल्यावर थुकी तोंडावर पडते हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवावे. संजय राऊत यांच्याबद्दल तर बोलायलाच नको, असे रामदास कदम म्हणाले.बलात्काराच्या गुन्ह्यात आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आले होते. तेव्हा मात्र याच पंतप्रधानांना मागच्या दाराने गपचूप जाऊन उद्धव ठाकरे भेटले. माझ्या मुलाला वाचवा, आज तुम्ही त्यांचं शिव्या देत आहात. तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलायची तुमची लायकी तरी आहे का? असे रामदास कदम म्हणाले.