Mumbai Elections News: वरळीत बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; नाराजांची मनधरणी सुरू
हेही वाचा: BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली ८६ उमेदवारांची यादी जाहीर
प्रभाग क्रमांक १९३ मध्ये हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देण्यात येत असताना सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिल्याने हा वाद अधिक चिघळला. तर प्रभाग क्रमांक १९६ मध्ये विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने महिला शाखाप्रमुख संगीता जगताप आणि युवासेना पदाधिकारी आकर्षिका पाटील नाराज झाल्या होत्या. तसेच प्रभाग क्रमांक १९७ मनसेला सोडल्याने काही पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनाम्याचा इशाराही दिला होता.
बंडखोरी होणाऱ्या प्रभागांचा आढावा अनिल परब घेणार भेट घेणार आहेत. सर्व नाराज नेत्यांना आणि एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांना मध्यरात्री मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या बैठकीत नेमका कोणता तोडगा निघाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नसली तरी वरळीमध्ये नाराजीचा फटका बसेल का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. संभाव्य बंडखोरी होणाऱ्या वॉर्डीचा आढावा घेण्याची जबाबदारी खासदार अनिल परब यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत नाराजांची समजूत काढून बंडखोरी रोखण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत राजकीय खेळी पाहायला मिळणार आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






