पुणे : ओळखीनंतर तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध (Rape on Girl) प्रस्थापित केले. परंतु, नंतर या तरुणीला कुटुंबाने लग्नासाठी नकार दिल्याचे सांगत लग्न करण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात संतोष गणपत राठोड (वय २७) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 23 वर्षीय पीडित तरुणीने तक्रार दिली आहे. जून 2022 ते मार्च 2023 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. तक्रारदार तरुणी मूळची पुण्यातील असून, तिची व आरोपीची गेल्या वर्षी ओळख झाली होती. त्यानंतर संतोष याने तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखविले. तसेच, तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर मात्र कुटुंब या लग्नाला तयार नाहीत, असे म्हणत टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. तसेच, लग्नाला नकार देऊन तिची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पुण्यात घडताहेत अनेक गुन्हे
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात विविध गुन्हे घडत आहेत. यामध्ये खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.