शिवशाही बस बंद पडण्याचे प्रकार (फोटो- सोशल मीडिया)
‘शिवशाही’ऐवजी ‘लालपरी’ची संख्या वाढवण्याची मागणी
गुहागर आगाराच्या जुन्या शिवशाही बंद पडण्याचे प्रकार
खराब शिवशाही बसेस गुहागरच्या मारल्या माथी
गुहागर: उपन्नात प्रगतीपथावर असूनही नशिबी जुन्या बस प्राप्त झालेल्या गुहागरच्या शिवशाही बस सातत्याने मध्येच रस्त्यात बंद पडत आहेत. स्पेअर पार्ट वेळेवर नसणे, तिकीट जास्त असल्याने उत्पन्न कमी अशी कारणे शिवसाही बसबाबत निर्माण झाल्याने या बसेस बंद करुन त्याठिकाणी लालपरी बस वाढवा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. दरम्यान, गुहागर आगाराला आणखी नव्या लालपरी बस देण्यात येतील असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते मात्र, अद्यापही ही मागणी पूर्ण झालेली नसल्याने आगाराच्या मागणीला केराची टोपली दाखविल्याचे बस चालकांमधून बोलले जात आहे.
खराब शिवशाही बसेस गुहागरच्या मारल्या माथी
नव्या बसच्या प्रतिक्षेत असलेल्या गुहागर एसटी आगाराला यावर्षी दुसऱ्या आगाराने वापरलेल्या शिवशाही बस पाठविल्या होत्या. या बस अतिशय खराब असून कोणत्याही क्षणी बंद पडतील अशा अवस्थेत असताना देखील त्या गुहागर आगाराच्या माथी मारल्या गेल्या होत्या. प्रवासादरम्यान, मध्येच रस्त्यात बंद पडणे, वातानुकुलित असल्याने प्रवाशांना भाडे न परवडणे व लोकल मार्गावर सोडण्यात आल्याने गुहागर आगाराची शिवशाही सेवा नेहमीच वादात सापडली आहे.
जुन्या बसेस पाठवण्यावरून टीका
स्पेअर पार्टही मिळत नाहीत त्यामुळे त्या वेळेवर दुरुस्तही होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. गुहागर आगाराला काही महिन्यापूर्वी ५ नव्या लालपरी बन्स मिळाल्या. या बसच्या शुभारंभप्रसंगी आणखी नव्या बसवी मागणी आगाराप्रमुखांनी त्यावेळी केली होती. मात्र, नाया बसेसच्या ऐवजी जुन्या वापरलेल्या शिवशाही बस आगारात पाठविल्या जात असल्याने अनेकांनी यावर टीका केली आहे. इतर आगारांमधून वापरलेल्या या जुन्या शिवशाही बस विचळूण-गुहागर मार्गवर वापरल्या जात आहेत. मात्र, अशा वातानुकुलित बसमधून प्रयास करणे सर्वसामान्य प्रवाशांना शक्य होत नसल्याने खचा परिणाम आगाराच्या उत्पन्नावर झाला आहे, याचा त्रास बस चालकांसह, कार्यशाळेतील देखभाल दुरुस्ती कर्मचान्यांनाही होत आहे. त्यामुळे शिवशाही बस बंद करून लालपरी बस सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.






