US-Iran War Alert: 'इराण ताबडतोब सोडा', अमेरिकेचा आपल्या नागरिकांना 'Exit'चा इशारा; ट्रम्पच्या युद्धनौका तेहरानच्या दिशेने रवाना ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
US citizens leave Iran immediately warning 2026: जगावर पुन्हा एकदा युद्धाचे सावट गडद झाले आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्षानंतर आता अमेरिका आणि इराण (US Iran war tension) एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अमेरिकेने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या नागरिकांसाठी ‘Red Alert’ जारी केला असून, त्यांना विनाविलंब इराण सोडण्याचे आदेश दिले आहेत. वॉशिंग्टन आणि तेहरानमधील तणाव आता अशा स्तरावर पोहोचला आहे जिथून कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते.
इराणमधील व्हर्च्युअल अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अमेरिकन नागरिकांनी इराणमध्ये राहणे आता सुरक्षित नाही. त्यांनी सरकारी मदतीची वाट न पाहता स्वतःची आपत्कालीन योजना तयार ठेवावी आणि तातडीने देश सोडावा.” इराणमधील वाढती नागरी अशांतता, इंटरनेट सेवांचा वारंवार होणारा खंड आणि प्रवासावरील कडक निर्बंध पाहता, अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. जर विमाने उपलब्ध नसतील, तर आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे रस्ते मार्गाने बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
डिसेंबर २०२५ पासून इराणमध्ये सुरू झालेली निदर्शने इराणी सरकारने ज्या पद्धतीने दडपली, त्यावरून मानवी हक्कांच्या मुद्द्यावर अमेरिका आक्रमक झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत इराणला इशारा दिला आहे. केवळ शब्दांनीच नाही, तर कृतीनेही अमेरिकेने आपली शक्ती दाखवण्यास सुरुवात केली आहे. ‘USS अब्राहम लिंकन’ ही अवाढव्य विमानवाहू युद्धनौका आणि इतर विनाशक नौका इराणच्या सीमेजवळ पोहोचल्या आहेत. या हालचाली पाहता, अमेरिकेचा रोख तेहरानमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याकडे असू शकतो, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
BIG: The U.S. has issued a fresh “Leave Iran now” alert, urging Americans to depart immediately. Citizens are advised to leave without relying on U.S. assistance, preferably by land via Türkiye or Armenia, or shelter in place if unable to depart. pic.twitter.com/NzXQiQrUyZ — Clash Report (@clashreport) February 6, 2026
credit – social media and Twitter
ज्या नागरिकांना तातडीने बाहेर पडणे शक्य नाही, त्यांना अमेरिकन सरकारने घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. अन्न, पाणी आणि अत्यावश्यक औषधांचा किमान १५ दिवसांचा साठा करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. निदर्शने होत असलेल्या भागांपासून दूर राहणे, आपले मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवणे आणि ‘स्मार्ट ट्रॅव्हलर एनरोलमेंट प्रोग्राम’ (STEP) द्वारे दूतावासाच्या संपर्कात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अमेरिका आणि इराणमधील शत्रूत्वाचा इतिहास जुना आहे. १९७९ ची इस्लामिक क्रांती आणि अमेरिकन दूतावासातील ओलीस संकट तेव्हापासून हे दोन्ही देश एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. मात्र, २०२६ च्या सुरुवातीलाच ज्या प्रकारे लष्करी हालचाली वाढल्या आहेत, त्यावरून हे स्पष्ट होत आहे की ट्रम्प प्रशासन इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला किंवा तिथल्या राजवटीला लगाम घालण्यासाठी मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे.
Ans: वॉशिंग्टन आणि तेहरानमधील लष्करी तणाव वाढल्याने आणि इराणमध्ये कधीही इंटरनेट व वाहतूक सेवा ठप्प होण्याच्या भीतीमुळे हा इशारा देण्यात आला आहे.
Ans: ही अमेरिकेची एक अत्यंत शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका (Aircraft Carrier) असून ती इराणजवळ युद्धाच्या तयारीसाठी तैनात करण्यात आली आहे.
Ans: सध्या हा इशारा अमेरिकन नागरिकांसाठी आहे, मात्र परिस्थिती बिघडल्यास भारत सरकारही आपल्या नागरिकांसाठी लवकरच 'ट्रॅव्हल ॲडव्हायजरी' जारी करू शकते.






