• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Mi Sansar Majha Rekhite Deepti Ketkar Holi Special Twist Sun Marathi Serial News

प्रेक्षकांच्या पत्रांनी भारावली Deepti Ketkar; होळीच्या खास आठवणी शेअर करत दिले ‘मोठ्या ट्विस्ट’चे संकेत

'सन मराठी वरील 'मी संसार माझा रेखिते' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. नवनवीन ट्विस्ट आणि रंजक कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 27, 2026 | 03:36 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • प्रेक्षकांच्या पत्रांनी भारावली Deepti Ketkar
  • होळीच्या खास आठवणी केल्या शेअर
  • ‘मोठ्या ट्विस्ट’चेही दिले संकेत
 
सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रंजक कथानक, अनपेक्षित वळणं आणि प्रभावी अभिनयामुळे ही मालिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडेच प्रेक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मालिकेतील कलाकारांना पत्रं पाठवून आपुलकी व्यक्त केली. या पत्रांतून मालिकेप्रती असलेली ओढ, प्रेम आणि जिव्हाळा स्पष्टपणे जाणवला. या प्रेमळ प्रतिसादाबद्दल मालिकेत अनुप्रिया ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीप्ती केतकर यांनी प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले.

होळी पौर्णिमेला ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये रंगणार थरारक पर्व; स्वामींच्या हस्तक्षेपाने उघड होणार सत्य

अभिनेत्री दीप्ती म्हणाली, “सर्वप्रथम मालिकेवर प्रचंड प्रेम केल्याबद्दल प्रेक्षकांचे मनापासून आभार. होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तर मनातील नकारात्मक भावना जाळून टाकण्याचा उत्सव आहे. आपल्या आजूबाजूला असलेले हेवे-दावे, राग, मत्सर या सगळ्या गोष्टी होलिकेत दहन व्हाव्यात, असं मला वाटतं. प्रत्येकाच्या नशिबात जे असतं, ते त्यांना मिळतंच. त्यामुळे सगळ्यांनी आनंदाने आणि एकोप्याने राहणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं.”

तिने आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना म्हटलं, “लहानपणी होळीची मज्जा काही वेगळीच असायची. धुलीवंदनाची तयारी एक दिवस आधीपासून सुरू व्हायची. रंग आणि पाणी मिसळून फुगे तयार करायचो आणि ते पूर्ण बादलीभर साठवून ठेवायचो. त्या आठवणी आजही ताज्या आहेत.”

आता सासरीही ती तितक्याच उत्साहाने होळी साजरी करते, असं सांगत दीप्ती पुढे म्हणाल्या, “मोठे झाल्यावर अनेक जण धुलीवंदन साजरी करत नाहीत. पण मी या बाबतीत खूप नशीबवान आहे. माझं कुटुंब आणि मित्रपरिवार दिवसभर रंगांची उधळण करत असतो. प्रत्येक धुलीवंदनासाठी मी हमखास सुट्टी घेते. आजवर एकही धुळवड मी चुकवलेली नाही.”

Salim Khan ११व्या दिवशीही आयसीयूमध्ये; Ranveer Singh आणि Alvira लीलावती रुग्णालयात दाखल

मालिकेत होळी कशी साजरी होणार याबद्दल मात्र त्यांनी उत्सुकता कायम ठेवली. “मी आत्ता सगळं सांगू शकत नाही; पण प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळणार आहे,” असं सूचक विधान करत त्यांनी चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढवली. श्रद्धा, कुटुंबमूल्ये आणि भावनिक गुंतवणूक यांचा संगम असलेल्या ‘मी संसार माझा रेखिते’ मालिकेचा आगामी भाग प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार, यात शंका नाही.

Web Title: Mi sansar majha rekhite deepti ketkar holi special twist sun marathi serial news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमचा सहभाग; महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश
1

एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमचा सहभाग; महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश

BO Collection: होळीच्या सुट्टीचा ‘The Kerala Story 2’ ला मोठा फायदा; बॉक्स ऑफिसवर केली बंपर कमाई
2

BO Collection: होळीच्या सुट्टीचा ‘The Kerala Story 2’ ला मोठा फायदा; बॉक्स ऑफिसवर केली बंपर कमाई

“माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…”, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा; सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य
3

“माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…”, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा; सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई
4

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

Mar 04, 2026 | 11:23 AM
Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर

Mar 04, 2026 | 11:22 AM
Iran US War : ५०० क्षेपणास्त्र, शेकडो ड्रोन्स… तरीही अमेरिकेचे नुकसान शून्य? उलट इराणची १७ जहाजे गाडली समुद्रात; ट्रम्प यांचा दावा

Iran US War : ५०० क्षेपणास्त्र, शेकडो ड्रोन्स… तरीही अमेरिकेचे नुकसान शून्य? उलट इराणची १७ जहाजे गाडली समुद्रात; ट्रम्प यांचा दावा

Mar 04, 2026 | 11:22 AM
जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा

जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा

Mar 04, 2026 | 11:15 AM
फक्त चवच नाही तर आरोग्याचा खजिना; दररोज खा अननस आणि मिळवा हे 7 आश्चर्यकारक फायदे

फक्त चवच नाही तर आरोग्याचा खजिना; दररोज खा अननस आणि मिळवा हे 7 आश्चर्यकारक फायदे

Mar 04, 2026 | 11:15 AM
Gadchiroli News: दुर्दैवी! रंग खेळून वैनगंगा नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई

Gadchiroli News: दुर्दैवी! रंग खेळून वैनगंगा नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई

Mar 04, 2026 | 11:07 AM
महिला प्रवाशांच्या हातात आता ‘पॅनिक बटण’ची सुविधा उपलब्ध! यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचरची व्यवस्था

महिला प्रवाशांच्या हातात आता ‘पॅनिक बटण’ची सुविधा उपलब्ध! यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचरची व्यवस्था

Mar 04, 2026 | 10:58 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.