कल्याण : प्रबोधनकर ठाकरे सरोवरातील (Prabodhankar Thackeray Sarovar) मा. स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे दर्शन घेऊन नतमस्तक होत प्रबोधनकार ठाकरे सरोवरच्या नुतनीकरणाच्या (Renovation) कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले.

सरोवारात लेजर शो (Laser Show) चे देखील लोकार्पण करण्यात आले. या सरोवारात सुरु झालेला लेजर शो हा राज्यातील दुसरा लेझर शो आहे. तसेच बी एस यु पी प्रकल्पतील १२०० प्रकल्प ग्रस्तांना चावी वाटप करण्यात आले आहे.

यावेळी केंद्रीय पंचायतराज मंत्री तथा भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील, कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, गणपत गायकवाड, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार नरेन्द्र पवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रेय शिंदे, पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, एसकेडीसीएलचे सीईओ प्रल्हाद रोडे, शहर अभियंता अर्जुन आहिरे, बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, आदींसह माजी नगरासेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.







