अक्कलकोट : अक्कलकोट तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह तीर्थक्षे त्रापैकी एक अशी सर्वाधिक गर्दीचे तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती होत आहे. मात्र अक्कलकोट तीर्थक्षेत्रातील मंदिरे गत्ली बोळातच आहेत. मंदिरा जवळ येऊन नव्या भाविकानां मंदिर कुठे आहे, अशी विचारणा करावी लागते. अरुंद अतिक्रमणयुक्त रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी भाविकातून व्यक्त होत आहे.
सर्व भागातून चारपदरी सहा पदरी जलद गती रस्त्यातून भाविक अक्कलकोटी दाखल होतात. अक्कलकोट तीर्थक्षेत्री मात्र प्रमुख मंदिरे गल्ली बोळात अरुंद रस्त्यामधूनच भाविकांना मार्गक्रमण करावे लागते. यातच मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणे, भर रस्त्यावर उभी राहणारी भाविकांची वाहने, रिक्षा यामुळे या परिसरात जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. वाहतुकीस अडथळा असलेले अतिक्रमण काढून टाकण्याची मोहिम नगरपािलका राबवित आहे. यामुळे शहरतील रस्ते मोकळे श्वास घेताना दिसतात. मात्र यामध्ये सातत्य राखण्याचे काम नगरपालिका यंत्रणेला जमेल काय ? याबद्दल शंका व्यक्त होत आहे.
मुख्याधिकारी सचिन पाटील, तहसिलदार बाळासाहेब शिरसट, पोलीस निरिक्षक जितेद्र कोळी यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहिम राबविली आहे. मात्र कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचा मास्टर प्लॅन राबविणे गरजेचे आहे
भूसंपादन करावे लागणार
नगरपालिकेने सन १९७२ मध्ये मास्टर प्लॅन तयार केला असले तरी शासनाने सुचविलेल्या सूचनेवरून वेळोवेळी त्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. सुधारित प्लॅन २०१२ मध्ये जाहीर करण्यात आला आहे. स्वामी समर्थ मंदिराच्या दक्षिण महाद्वार ते मुरलीधर मंदिर, फत्तेसिह चौक, तूप चौक ,कापड बाजार मेन रोड, कारंजा चौक, मार्गे समाधी मठ ते ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर पर्यंत असा मार्ग आहे. हा मार्ग १२ मीटर रुंदीचा, ८५० मीटर लांबीचा असणार आहे. सध्या २५ ते २८ फुटाचा रस्ता अस्तित्वात असून दोन्ही बाजूने मिळून १० फुट भूसंपादन करावे लागणार आहे. यासाठी किमान २०० प्रॉपटी बाधित होणार आहेत.
असा आहे दुसरा पाखली मार्ग
मंदिराच्या उत्तर महाद्वार ते गुरू मंदिर, राम गल्ली, मधला मारुती, सुभाष गल्ली, दावल बँड ते कारंजा चौक मार्गे समाधी मठ असा दुसरा पालखी मार्ग असणार आहे. ९ मीटर रुंदीचा, ६०० मीटर लांबीचा असून सध्या २२ फुटाचा रस्ता अस्तित्वात आहे. दोन्ही बाजूने मिळून ८ फुटाचा भूसंपादन करावा लागणार आहे. १२५ ते १५० प्रॉपर्टी बाधित होणार आहे.