आरएसएसचे नेते प्रभाकर भट यांनी हिंदूंना शस्त्र ठेवण्याचा सल्ला दिला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यामुळे अशांतता निर्माण झाली आहे. पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांना धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेच्या विरोधात देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. तसेच कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सीमा भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते प्रभाकर भट यांनी एक वक्तव्य केले आहे. याची सर्वत्र चर्चा आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. पर्यटकांना कलमा येत आहे का? त्यांची ओळखपत्रे बघत आणि कपडे काढायला लावून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. यामुळे हिंदू समाजाकडून आक्रमक कारवाईची मागणी केली जात आहे. या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते प्रभाकर भट यांनी केरळमध्ये एक वक्तव्य केले आहे. आरएसएसचे ज्येष्ठ नेते के. प्रभाकर भट यांनी दहशतवादी हल्ल्याचा हवाला देत हिंदूंना हत्यारे बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वरकाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रभाकर भट यांनी हिंदूंना घरात तलवारी आणि चाकू ठेववण्याचा सल्ला दिला आहे. ‘प्रत्येक हिंदूच्या घरात तलवार असली पाहिजे, जर पहलगाम हल्ल्यादरम्यान हिंदूंनी तलवार दाखवली असती तर ते पुरेसं असतं. त्यांनी महिलांना देखील नेहमीच्या वस्तूंसोबत त्यांच्या बॅगेत चाकू ठेवला पाहिजे, असे मत प्रभाकर भट यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले की, सहा इंचाचा चाकू ठेवण्यासाठी कोणत्या ‘परवाना’ची आवश्यकता नाही…’ असं दावा करत प्रभाकर भट म्हणाले, ‘जर संध्याकाळी तुम्ही बाहेर असाल आणि हल्ला होण्याची शक्यता असेल तर, हल्लेखोराकडे विनंती करु नका. फक्त त्याला चाकू दाखवा की तो पळून जाईल. पूर्वी हिंदू-मुस्लिम संघर्षाच्या वेळी हिंदू पळून जायचे. आता हे चित्र बदलत आहे, आपण संघर्षासाठी सज्ज असलं पाहिजे आणि प्रत्येकाने तलवार घरी ठेवल्या पाहिजे, असे वक्तव्य प्रभाकर भट यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मोहन भागवत यांची भूमिका काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी यापूर्वीच पहलगाम हल्ल्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. भागवत म्हणाले की, जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानव धर्म. त्यालाच हिंदू धर्म म्हणतात. आपल्या जवानांनी किंवा आपल्याकडच्या लोकांनी कधी कुणाला धर्म विचारून लोकांना मारलेले नाही. कट्टरपंथीयांनी जो उत्पात केला, तसा हिंदू कधीही करणार नाही. या सर्व कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. पण आमच्या मनात क्रोधही आहे. तो असला पाहिजे. द्वेष, शत्रुता हा आपला स्वभाव नाही. पण मार खाणं हाही आपला स्वभाव नाही. शक्तीवान माणसाला अहिंसक असायला हवं. जो दुर्बल आहे, त्याला हे व्हायची गरजच नाही. त्याला व्हाव लागतं अहिंसक. म्हणून शक्ती असायला हवी. ती दिसलीही पाहिजे, म्हणजे जगाला कळतं हे शक्तीवान आहेत, यांच्या वाट्याला जाऊ नये. मग जगातल्या दुष्ट लोकांनाही हे समजतं, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले होते.