उदय सामंत (फोटो- ट्विटर)
बारामतीतून बॅगा पाठवल्या जात आहेत: सदाभाऊ खोत
गोपीचंद पडळकर नावाचा गाव गाड्यातला आमदार झाल्यानंतर मंत्री होणार म्हणून त्यांना पाडण्यासाठी राज्यातील यंत्रणा कामाला लागली आहे. यासाठी बारामतीतून बॅगा पाठविल्या जात असल्याचा आरोप करून सदाभाऊ खोत म्हणाले पडलकरांना हरविण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. काही लोक क्लिपा व्हाययरल करीत आहेत पण त्याचा उपयोग होणार नाही. कारण लोकांनी पडळकर याना विधानसभेत पाठविण्याचे ठरविले आहे. पडळकर बाहेरुन आला आहे, असा आरोप काहीजण करीत आहेत त्यांनी आधी सोनिया गांधी कुटून आल्या हे आधी सांगावे. माझी आणि गोपीचंदची सर्जा राजाची जोडी आहे. मी अजून सहा वर्षे आमदार आहे. गोपचंदही आमदार होणार आहेत. पाच वर्षात जतचा कायापालट करू. लाडकी बहीण योजने विरोधात कोर्टात गेलेले लोक आता आपल्या जाहीरनाम्यात बहिणींना तीन हजार रुपये देण्याची घोषणा करतात अशा फसव्या माणसावर विश्वास ठेवू नका.