मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज नागपुरातील (Nagpur) रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृतीभवन येथे आदरांजली वाहिली. तसेच, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr. K. B. Hedgewar) यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन वंदन केले. यावर संजय राऊत यांनी शालजोडीतले टोले हाणले.
रेशिमबागेत जाऊन आलात आनंद आहे. या वास्तूसोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते, असे ट्विट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.
रेशिमबागेत जाऊन आलात आनंद आहे! या वास्तू सोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/Zrp1CEeveK— Sanjay Raut (@rautsanjay61) December 29, 2022
संघ विचारांचा रेशमी कीडा हा त्यांच्या कानात वळवळत आहे. काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी आणि हाफ पॅंट घालून येतील एवढ्या लवकर बदल होईल असे वाटले नव्हते, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
तसेच, एकदा मुख्यमंत्री कार्यालयात भाजपवाले कसे घुसतील, हे शिंदे गटाला कळणारही नाही, असेही ते म्हणाले.