Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) रविवारी (2 जुलै) एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राजभवनात मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सगळ्यात उद्धव ठकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत (Ajit Pawar) यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करण्याचं काही जणांनी ठरवलं आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने चालवू द्या, कारण मी शरद पवार यांच्याशी नुकतेच बोललो. त्यांनी सांगितले की ते खंबीर आहेत आणि त्यांना लोकांचा पाठिंबा आहे.”ते उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा सर्व काही उभं करतील. लोक हा खेळ जास्त काळ सहन करणार नाहीत.”
शिवसेनेसारखाच राष्ट्रवादी पक्ष फुटला का? शरद पवार यांचा अजित पवार यांच्या शपथविधीला पाठिंबा आहे का? शरद पवार यांना भाजपबरोबर जायचंय का? अशा प्रश्नांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेत. त्यावर शरद पवारांची भूमिका स्पष्ट करण्याचा संजय राऊतांनी प्रयत्न केलेला आहे. अजित पवार यांच्या शपथविधीवर शरद पवार यांच्याशी फोनवरुन बोलणं झाल्याचंही राऊतांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर, “एकनाथ शिंदेंसब 16 आमदार अपात्र ठरतील, हेच या शपथविधीतून स्पष्ट झालंय” असंही राऊत म्हणाले.
यानंतर संजय राऊतांनी आणखी एक ट्विट केलं आहे त्यात त्यांनी म्हटलंय, “ज्यांना भाजपने तुरुंगात पाठवले त्यांनीच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.”
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोड आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रींमंडळात आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जातीये.