जळगाव : शेदुर्णी येथे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात (School Bus Accident) झाला. या अपघातात अख्खी बसच पलटी झाल्याची घटना घडली. येथील सरस्वती विद्या मंदिर (Saraswati Vidya Mandir) या शाळेतील विद्यार्थी शाळेच्या बसने जात होते. या बसमध्ये 30 विद्यार्थ्यांसह शिक्षकही बसमध्ये होते. पहूर ते शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबाजवळ अपघात झाला. यात बस पटली झाली.
शाळेच्या बसला अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. अपघातात अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झाले. या जखमींना खासगी वाहनांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहेत. या अपघातात कोणीही गंभीर जखमी नसल्याचे सांगितले जात आहे.
पालकांमध्ये भीतीचे वातावरण
या स्कूल बसला अपघात होऊन बस पलटी झाली. या अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यावर पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. यातील काही विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
तांत्रिक अडचणींमुळे बसचा अपघात
या अपघातात जवळपास 30 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील काही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे. बसचा हा अपघात तांत्रिक अडचणींमुळे झाला असल्याची सांगितले जात आहे.