वाळवा ठरतोय राजकीय केंद्रबिंदू; इस्लामपूर शहराभोवती फिरतेय जिल्ह्याचे राजकारण
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधावनसभा निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी माहाविकास आघाडीचा महामेळावा पार पडत आहे. शिवसेना ठाकरे गट, शरद पवार आणि नाना पटोले यांच्यासह सर्व पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडत आहे. महाविकास आघाडीचे नेते यामधून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. त्यामुळे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये विलक्षण उत्साह दिसून येत आहे. या महामेळाव्याचे यजमानपद शिवसेना ठाकरे गटाकडे असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पहिले भाषण केले. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबोधित केले. यावेळी तुतारीच्या आवाजाने त्यांचे स्वागत करण्यात आले. जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करत विरोधकांवर निशाणा साधला.
हे घाबरलेलं सरकार
या महामेळाव्यामध्ये जयंत पाटील यांनी भाषण करताना म्हणाले, “महाविकास आघाडीची ही सभा अनेक दिवसांपासून घेण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र सरकार निवडणूक कधी घेणार हे स्पष्ट करत नव्हते. आज देखील निवडणूक आयोग जाहीर करणार आहे ती सुद्धा हरियाणा आणि इतर राज्यांची जाहीर होणार आहे. महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली जाणार नाही. कारण महाराष्ट्र सरकार घाबरलेलं सरकार आहे. त्यांना निवडणूकीची भीती आहे. यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घ्यायला देखील हे घाबरले. मागच्या दीड वर्षांमध्ये जो यांनी कारभार केलेला आहे. त्यामुळे जनतेच्या लक्षात आले आहे की काय प्रकारचं काम हे लोक करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांनीच लोकसभेमध्ये यांना मोठा धक्का दिला आहे. यांना आता निवडणूका ऑक्टोबरमध्ये घेण्याचं धाडस होणार नाही. म्हणून निवडणूक आयोग दिवाळी झाल्यानंतरच निवडणूक जाहीर करेल आणि तेव्हाच हे समोरे जातील. त्याच्या आधी निवडणूका घेण्याची ताकद नाही.” असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
लोकसभेममध्ये 240 गाडी थांबल्यावर दोघांचे टेकू घेतले
जयंत पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांवर जहरी टीका केली. ते म्हणाले, “हे निवडणूका लवकर घेणार नाहीत. कारण लोकांनी लोकसभेमध्ये मोठा धक्का दिला आहे. 400 पारचा नारा देणारे 240 वर थांबले. 240 गाडी थांबल्यावर दोघांचे टेकू घेतले. एक बिहारचा टेकू आणि एक आंध्रप्रदेशचा टेकू घेतला. पण हे दोन टेकू पलटी मारण्यात बहाद्दर आहेत की यांचं दिल्लीचं सरकार कधी खाली येईल सांगता येत नाही. यांचा सहा महिने किंवा वर्ष एवढाच विषय राहिलेला आहे. म्हणून लाल किल्ल्यावरुन भाषण करताना सिक्युलर सिव्हिलकोड शब्द वापरायला लागला, यातचं तुमची हार समोर आली. मागच्या दहा वर्षापासून जो तुम्ही टेंबा मिरवला भारतात त्यात सिक्युलर शब्द वापरत नव्हता. पण आता ह्यांच्या लक्षात आलं की भारत तुम्हाला सहजासहजी चालू देणार नाही,” असा टोला जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदी यांना खोचक टोला लगावला.
मविआचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष
महाविकास आघाडीच्या महामेळाव्याला तिन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यांना संबोधित करताना जयंत पाटील म्हणाले, “लोकसभेमध्ये भाजपचा पराभव करुन महाराष्ट्राच्या जनतेची भावना समोर आणली आहे. आता दोन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका होतील, आता योग्यवेळी आपण सर्व पक्ष एकत्र आलो आहेत. आपण सगळे एकदिलानं आणि एकमुखानं राहिलो तर महाराष्ट्रातलं सरकार महाविकास आघाडीचं येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तुम्ही काही चिंता करु नका, पण एकमेकांना सहाय्य करणं आणि आपला महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी कसा होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे. आजपासून आपण कामाला लागू,” असे आवाहन शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.