• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Shepherd Son Birudev Dhone Becomes Ips Officer

मेंढपाळाचा मुलगा झाला IPS अधिकारी; मित्रांचा फोन आला अन् आनंदच आनंद झाला

बिरदेवचे वडिल सिद्धापा डोणे यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची, मेंढपाळ व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2025 | 03:11 PM
मेंढपाळाचा पोरगा झाला आयपीएस अधिकारी

मेंढपाळाचा पोरगा झाला आयपीएस अधिकारी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर / दीपक घाटगे : खांद्यावर घोंगडे, डोक्यावर टोपी, पाणी पिण्यासाठी लोकरीचा काचोळा काखेत मारून पायात जाडजूड पायतान, मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती, वर आभाळ…खाली धरती हेच आपले घर माणून जीवन कंठणाऱ्या एका मेंढपाळाच्या मुलाने अथक प्रयत्नातून आयपीएस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. तो ही परीक्षा पास झालेला निकाल ऐकण्यासाठी सुद्धा गावी नव्हता.

चक्क मेंढपाळ वस्तीत मेंढ्यांच्या केसांची कात्रण करत असताना मित्रांचा फोन आला ‘अरे, तू यूपीएससीची परीक्षा पास झालास अभिनंदन…तर जवळच असलेल्या आई-वडिलांना मुलगा साहेब झाला एवढेच समजले, उमगले आणि अवघा मेंढपाळ वाडा आनंदाच्या भरात सुंबरान मांडलं, गं सुंबरान मांडलं’, हे गीत गाऊ लागले ही हकीकत आहे. कागल तालुक्यातील बिरुदेव सिद्धाप्पा ढोणे या युवकाची.

2024 मध्ये केंदीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कागल तालुक्यातील यमगे येथील मेंढपाळाचा मुलगा अवघ्या 27 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 551 रँकने उत्तीर्ण झाला. त्यामुळे बिरदेव हा कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल (मंगळवारी) दुपारी जाहीर झाला. त्यामध्ये बिरदेव उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याच्या जन्मगावी यमगे येथे बिरदेवच्या अनुपस्थितीत जल्लोष करण्यात आला.

बिरुदेव हे यमगेचे सुपुत्र

बिरुदेव हे कागल तालुक्यातील यमगे गावचे सुपुत्र आहेत. इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असताना बिरदेवने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सहभागी झाला होता. पण त्यामध्ये अपयश आल्याने त्याने खचून न जाता मोबाईल, टीव्ही व खेळ यापासून अलिप्त राहत जिद्दीच्या जोरावर केवळ अभ्यासाला महत्व दिले. बिरदेव हा सुरुवातीपासूनच हुशार होता. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये मुरगूड केंद्रात सर्वप्रथम आला होता. गणित विषयात त्याला या दोन्ही परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळाले होते.

बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदिर या शाळेत पूर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण जयमहाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले तर इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या सीओईपी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर बिरदेवने दिल्लीमध्ये आयपीएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे क्लास सुरु केला . या ठिकाणी त्याने दिवसातून 22 तास अभ्यास करत परीक्षेची तयारी केली.

दिल्लीत घेतले मार्गदर्शन

दिल्लीत आयएएस क्लासेसमध्ये परीक्षेसंबधी मार्गदर्शन घेतले. त्यानंतर जोरदार अभ्यासाची तयारी केली. दिल्लीत अभ्यास पूर्ण करून परीक्षा दिली. अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने यश संपादन केले आहे.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज समजताच कागल तालुक्यातील यमगे येथे त्याच्या गावी मित्र परिवाराने जल्लोष केला. मात्र, बिरदेव हा बेळगाव जिल्ह्यातील एका खेडेगावात आपल्या मामांच्या मेंढ्यासह आपल्या मेंढ्या एकत्रित करून मेंढ्याची राखण करत होता. मेंढ्यांची केस पावसाळ्याच्या अगोदर कटिंग केली जातात. केस कटिंग करत असताना त्याला फोन आला. ‘बिरुदेव, तू यूपीएससीची परीक्षा पास झालास…’ हे ऐकताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र, निकाल गावात बिरूदेव रानात अशी स्थिती झाली.

बिरदेवची आर्थिक परिस्थिती बेताची

बिरदेवचे वडिल सिद्धापा डोणे यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची, मेंढपाळ व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आपला मुलगा बिरदेव याला उच्चपदस्थ अधिकारी बनविण्याच्या उद्देशाने शिक्षण दिले.

महिन्याला लागायचे 10-12 हजार

दिल्लीत अभ्यास करत असताना महिन्याला दहा-बारा हजार रुपये त्याला खर्चासाठी पाठवणे वडिलांना कठीण झालेलं होते. त्यामुळे हा नाद सोड आणि एखादी नोकरी कर असा तगादा वडिलांनी बिरदेवकडे लावला होता. मात्र, यूपीएससी परीक्षेत यशस्वी होणारच ही जिद्द बोलून दाखवली. बिरदेवचा भाऊ वासुदेव डोणे हा चार वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात भरती झाला आहे. त्यामुळे बिरदेवच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळू शकली. वडिल सिद्धाप्पा, आई बाळाबाई , विवाहित बहिण, भाऊ असे कुटूंब आहे.

Web Title: Shepherd son birudev dhone becomes ips officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल
1

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन
2

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक
3

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प
4

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूसह केरळमधील निवडणुका होणार एप्रिलमध्ये; आसाममध्ये…

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूसह केरळमधील निवडणुका होणार एप्रिलमध्ये; आसाममध्ये…

Feb 18, 2026 | 07:10 AM
Women Health: मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य

Women Health: मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य

Feb 18, 2026 | 05:30 AM
सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्र! पात्रता निकष काय? आवश्यक गुण; जाणून घ्या

सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्र! पात्रता निकष काय? आवश्यक गुण; जाणून घ्या

Feb 18, 2026 | 04:15 AM
राज्यातील Business सेक्टरला मिळणार भरारी; ‘या’ ठिकाणी उभे राहणार ‘ड्रोन क्लस्टर’

राज्यातील Business सेक्टरला मिळणार भरारी; ‘या’ ठिकाणी उभे राहणार ‘ड्रोन क्लस्टर’

Feb 18, 2026 | 02:35 AM
सुर्याचा चढता पारा देतोय पाणीटंचाईला आमंत्रण; पिण्याच्या पाण्याची योग्य नियोजन अन् उपाययोजना करण्याची गरज

सुर्याचा चढता पारा देतोय पाणीटंचाईला आमंत्रण; पिण्याच्या पाण्याची योग्य नियोजन अन् उपाययोजना करण्याची गरज

Feb 18, 2026 | 01:10 AM
इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

इंदापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी हेमा माडगे यांना संधी द्या; भिगवणकरांची आग्रही मागणी

Feb 18, 2026 | 12:30 AM
सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

Feb 17, 2026 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.