संग्रहित फोटो
कर्मचाऱ्याची उर्मट भाषा
मोहिते यांनी संबंधिताला फोनवर विचारणा केली असता त्याने उर्मट भाषा वापरली. त्यामुळे मोहिते यांच्यासह जावली तालुका प्रमुख नितीन गोळे, वाहतूक सेना विक्रांत गावडे, सातारा शहर प्रमुख शिवराज टोणपे, शहर संघटक प्रणव सावंत, युवा सेना सागर धोत्रे, आकाश पवार, रवी पार्टे, रवी गोळे, प्रकाश गोळे, बापू दुर्गवळे, ज्ञानेश्वर शेलार, जीवन शिंदे, अमोल गोळे, मनोज गावडे, सागर गुजर, शुभम तरडे, गणेश गोळे, प्रवीण पवार, बापू गावडे व शिवसैनिक यांनी टोल नाका गाठला आणि टोल नाक्यावर एकच गोंधळ उडाला.
प्रश्नांना उत्तर देताना नाकीनऊ
टोल प्रशासनाला प्रश्नाच्या भडिमारला उत्तर देता देता नाकी नऊ आले. शेवट शिवसैनिक आक्रमक होत आहेत हे पाहिल्यावर पोलिस प्रशासन त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी मध्यस्ती करत आरोपीला स्वतः पोलिस स्टेशनला घेऊन आले.
व्यवस्थापकांना खडे बोल सुनावले
शिवसैनिकांचा मोर्चा टोल नाक्यावरील भुईंज पोलिस स्टेशनला वळला. एपीआय कांबळे भेटून सविस्तर सर्व प्रकरण सांगितले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्वरित संबधित कर्मचारी याच्यावर गुन्हा दाखल करावयास सांगितला. सर्व शिवसैनिक यांच्यासमोर टोल प्रशासन व्यवस्थापकांना खडे बोल सुनावले. कडक सूचना दिल्या गेल्यानंतर गुन्हा दाखल झाला.