माथेरानमध्ये श्रीराम नवमी उत्सवाचे ग्रामस्थ मंडळाकडून आयोजन…
संतोष पेरणे- माथेरान
माथेरान या पर्यटन स्थळी असलेल्या पुरातन श्रीराम मंदिरात श्रीराम नवमीच्या निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले गेले.त्यातील पालखी सोहळ्यात शहरातील सर्व जाती धर्माचे भाविक यांचा सहभाग होता हे या सोहळ्याचे विशिष्ट समजले जाते. माथेरान ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून श्रीराम नवमीच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.श्रीराम चौक येथे असलेल्या मंदिरात सकाळी अभिषेक आणि आरती झाल्यानंतर ग्रामस्थ मंडळाचे भजन झाले.
सायबर चोरट्यांनो खबरदार! गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी…; CM फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
संध्याकाळी श्रीरामाची पालखी तून मिरवणूक काढण्यात आली.त्यात सगळ्यात अग्रभागी गावातील हरिपाठ मंडळ आणि भजन मंडळ यांचा सहभाग होता.माथेरान मधील संस्कृतिक महिला मंडळाने यावेळी श्रीराम नवमी निमित्त पालखी सोहळ्यात लेझीम पथक सज्ज ठेवले होते.त्याचवेळी हरिपाठ मंडळाने दर गुरुवारी सुरू केलेली हरिपाठची परंपरा महिला सांस्कृतिक मंडळ पुढे नेत असल्याने यावर्षी श्रीराम नवमीच्या पालखीची धुरा महिला मंडळ पाहत होते.
Maharashtra Politics : सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते? सतेज उर्फ बंटी पाटील यांचा सवाल
‘सांस्कृतिक महिला मंडळ’ माथेरान यांच्यातर्फे राम नवमी पालखीला गरबा नृत्य आयोजित केले होते. वर्षा शिंदे,स्नेहा चव्हाण, रेखा चौधरी, सुहासिनी दाभेकर, सुजाता जाधव, कृतिका रांजाणे, पौर्णिमा कदम, नताशा मोरे, कस्तुरी पारटे, शर्वरी परदेसी तसेच या महिलांना मदत करण्यासाठी स्वाती कुमार, अर्चना बिरामणे,वंदना लोटणकर यांनी सहभाग घेतला होता.