 
        
        मंत्री नितेश राणे (फोटो- सोशल मीडिया)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सखोल अभ्यास सुरू
नीती आयोगाचे शिष्टमंडळ जिल्हा दौऱ्यावर
पंतप्रधान कार्यालयास देणार अहवाल
सिंधुदुर्ग: देशात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावला आहे. या उपक्रमाची दखल देशाच्या नीती आयोगाने घेतली असून, आयोगाचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे. या शिष्टमंडळामध्ये डॉ. देवव्रत त्यागी आणि विदीशा दास यांचा समावेश आहे. विविध विभागांनी आपल्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) कसा प्रभावी वापर केला आहे. याची पाहणी आयोगाकडून करण्यात येत आहे. या दौऱ्याव्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या डॉ. देवव्रत त्यागी, विदिशा दास या सदस्यांचे स्वागत केले.
जि.प.सह इतर विभागांत येणार अचुकता
एआय वापरामुळे प्रशासनात पारदर्शकता गुणवता येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती संकलित करुन माईल कंपनीशी समन्वय साधला आणि आज आम्ही या टप्प्यावर येऊन पोहचलो आहोत. एआय प्रणालीमुळे वेळ, पैशाची देखील बचत होणार आहे. निती आयोगाच्या दौ-यामुळे आमच्या प्रयत्नांना अधिक मुर्तरूप येणार असल्याचेही राणे म्हणाले. जिल्हाधिकारी घोडमिसे यांनी, एआय प्रणालीची पार्श्वभूमी, त्यावर करण्यात आलेल्या प्रयानांविषयी सादरीकरणाव्दारे माहिती दिली, त्या मागाल्या एआय प्रणालीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अद्ययावत सहर रुम स्थापन करण्यात आले आहे.
प्रशासनात येणार अधिक पारदर्शकता व गुणवत्ता
जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उप वनसंरक्षक मिलिशा शर्मा, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी फलकमंत्री नितेश राणे यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनामध्ये एआय प्रणालीचा समावेश करण्याच्या अनुषंगाने करण्यात आलेले प्रयत्लांविषयी शिष्टमंडळाला सांगताना ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहिलेला आहे. त्या अनुषंगाने एआय प्रणाली प्रशासनात कशा प्रकारे अंतर्भूत करण्यात येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.






