(File Photo : Food Poison)
इचलकरंजी : जिल्ह्यातील शिवनाकवाडी येथील यात्रेतील महाप्रसादातून सुमारे 200 जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. त्यानंतर जिल्हा प्रशासन हादरून गेले होते. दरम्यान, गुरुवारी परिस्थिती नियंत्रणात आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आयजीएम रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.
हेदेखील वाचा : Ladki Bahin Yojana : एका महिन्यात तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी झाल्या योजनेतून बाद; संजय राऊतांचा घणाघात
काही संबंधित रुग्णांवर गावातीलच शाळा, सांस्कृतिक हॉल या ठिकाणी उपचार करण्यात आले. तर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णावर उपचार सुरू होते. तर काही रुग्ण अतिदक्षता विभागात होते. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आरोग्य विभागाने तातडीने पावले गतिमान करत रुग्णांवर तातडीने उपचार केल्याने गुरुवारी गावातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. नवीन रुग्ण सापडले नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांनी दिली. येत्या दोन दिवसात सर्व रुग्ण बरे होतील, असा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
भेसळ खव्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय
शिवनाकवाडी येथे यात्रेत विषबाधेची मोठी घटना समोर आली आहे. यात्रेत महाप्रसाद किंवा स्टॉलवरील अन्न सेवन केल्यानंतर शेकडो नागरिकांना त्रास झाला तर काही जणांची प्रकृती गंभीर होती. मात्र, विषबाधेची घटना महाप्रसादातील भेसळ खव्यामुळे झाल्याची चर्चा दिवसभर सुरु होती. सदरचा खवा कोणत्या व्यापाऱ्याकडून आणला याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे समजते.
याबाबत अन्न औषध प्रशासन अधिकारी महेश मासाळ यांच्याशी चर्चा केली असता, ते म्हणाले खिरीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, अहवाल प्राप्त झाल्यानंतर कशामुळे विषबाधा झाली हे नक्कीच स्पष्ट होईल. त्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेकडो जणांना विषबाधा
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवनाकवाडी येथे ग्रामदैवत श्री कल्याणताई मातेच्या यात्रेत महाप्रसाद किंवा स्टॉलवरील अन्नातून शेकडो जणांना विषबाधा झाल्याचे दिसून आले. उलटी, मळमळ सुरू झाल्याने 187 रुग्णांना तत्काळ इचलकरंजी येथील आयजी रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगणात आले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
हेदेखील वाचा : Kolhapur News : माजी आमदारासोबतचा वाद आयुक्तांना महागात पडला; राज्य सरकारने प्रशासकपदाचा कार्यभारच काढून घेतला