मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यातच भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र लिहून औरंगजेबची माफी मागितली होती, असं विधानं केलं आहे, त्यानंतर संजय गायकवाड, मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत.
[read_also content=”संघाला विरोध आणि पीएफआयला इलूइलू? शिवसेना उध्दव ठाकरे गटाला आशिष शेलार यांचा सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-mla-ashish-shelar-some-question-ask-to-uddhav-thackeray-group-350755.html”]
काल भाजपा आमदारा प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म शिवनेरी नसून, कोकणात झाला आहे. आणि महाराजांचे बालपण रायगडावर गेले आहे, असं म्हटलंय. यानंतर राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या व राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून भाजपाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया समोर येत असून, राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणीला जोर धरु लागला आहे. तर प्रसाद लाडांनी माफी मागावी असं शिवप्रेमीनी म्हटलं आहे.
दरम्यान, यावर राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांची प्रतिक्रिया समोर आली असून, संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, यासाठी महापुरुषांबद्दल बोलण्यासाठी कायदा करायला हवा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. जे कायदा केला तर, जेणेकरून कुणाचं धाडस होणार नाही आणि वारंवार महापुरुषांबद्दल बोलणाऱ्यांना राज्यातून हाकलून देण्याची तरतूद कायद्यात पाहिजे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान जनता सहन करणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या वाचाळवीरांना थांबवले पाहिजे, तसेच अशा वाचाळवीरांवर म्हणजे कोश्यारी, मंगलप्रभात लोढा तसेच संजय गायकवाड व प्रसाद लाड (Koshyari, Mangalprabhat Lodha and Sanjay Gaikwad, Prasad lad) यांच्यावर पक्षाने कारवाई केली पाहिजे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले. प्रसाद लाड यांनी महाराजांची चुकीची माहिती दिली. भाजपाने अश्या नेत्यांना खरा इतिहास शिकवला पाहिजे, अशी टिका संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी भाजपावर केली.