कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची शानदार कामगिरी (फोटो- ट्विटर)
कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मधील बॉक्सिंग, ज्युडो आणि पॅरा-ॲथलेटिक्स प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचा नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करत त्यांना रोख पारितोषिकांचे धनादेश प्रदान करण्यात आले. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंना 30 लाख, रौप्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 20 लाख आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
हे काय बोलून गेला Neeraj Chopra? ‘मी नसलो तरी भारताकडे पदक…’; PM Modi यांनी शेअर केली खास पोस्ट
An inspiring interaction with our CWG 2026 Judo and para-athlete champions, whose strength and resilience made Bharat proud in Glasgow! 🇮🇳 pic.twitter.com/2pbTkIB8TE — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 4, 2026
काय म्हणाले मंत्री मनसुख मांडविया?
केवळ सरकारी नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने राष्ट्रकुल पदक जिंकू नका. निवृत्तीनंतर सर्वांनी आपापल्या स्पोर्ट्स अकादमी सुरू करा आणि नव्या पिढीला मार्गदर्शन करा. ‘इंडिया फर्स्ट’ हेच आपले मुख्य ध्येय असायला हवे.केंद्र सरकारने भारतीय खेळांच्या शाश्वत विकासासाठी ‘खेलो इंडिया’ योजनेचा विस्तार केला आहे. तसेच त्यासाठी ₹३६,००० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा झाल्यावर लवकरच आशियाई खेळ 2026 सुरू होणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मधील ऐतिहासिक यशानंतर आता भारतीय खेळाडूंचे पुढील मुख्य लक्ष्य आशियाई खेळ २०२६ हे असणार आहे. राष्ट्रकुल पदकांचा जल्लोष साजरा करत असतानाच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत आगामी आशियाई स्पर्धेत आणखी सुवर्णपदके जिंकण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.






