फोटो सौजन्य सोशल मीडिया
कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील धोकादायक इमारतींवर महापालिकेची नजर; स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
राजवाडा परिसरातील सर्व श्रमिक संघ व सातारा म्युनिसिपल कामगार युनियन (लाल बावटा) कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र प्रवक्ते कॉ. विजय मांडके यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Nagpur News : विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीचा वाद आता हायकोर्टात ! राज्यसरकार सह प्रतिवादींना नोटीस .
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सातारा जिल्हा समितीचे प्रमुख कार्यकर्ते कॉ. माणिक अवघडे यांनी क्रांतीसिंहांच्या प्रतिसरकार चळवळीचा संदर्भ देत लोकशाही, सामाजिक सलोखा आणि जनतेच्या प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभे राहण्याची आवश्यकता व्यक्त केली.
युवकांनी समाजात संवाद, संघटन आणि जनजागृतीची भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले.
कॉ. विजय मांडके यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचा उल्लेख करत श्रमिक, महिला, युवक, शेतकरी, शेतमजूर, कामगार तसेच सर्व समाजघटकांना लोकभाषेत संवाद साधत संघटित करण्याचे आवाहन केले.
Nagpur : पाच वर्षांतच पुलाची वाट लागली! पिवळी नदीवरील ५० मीटर पूल धोकादायक
सुहास पुजारी यांनी सांगली जिल्हा आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांचे ऐतिहासिक संबंध स्पष्ट केले. प्रकाश खटावकर आणि अॅड. विलास वाहगावकर यांनी समविचारी संघटना व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे सामाजिक प्रश्नांवर काम करण्याची गरज व्यक्त केली. कॉ. विजय निकम यांनी साताऱ्यातील ‘चलेजाव’ चळवळीच्या स्मारकाबाबत माहिती देत ते लवकर पूर्ण व्हावे, यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास कॉ. शंकर पाटील, कॉ. प्रमोद परामणे, कॉ. विजय निकम, सुहास पुजारी यांच्यासह अनिल वीर, शिवाजी माने, आप्पा खंडझोडे, रेखाताई खंडझोडे, सूर्यकांत घोरपडे, जुबेर मुजावर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कॉ. प्रमोद परामणे यांनी मानले.






