Solapur News: माध्यमिक शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय; एका दिवसात 210 शाळांना मंजुरी आदेश
Solapur News: माध्यमिक शिक्षण विभागाने दिवाळीच्या तोंडावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. टप्पा अनुदान मंजूर झालेल्या 210 शाळांना ऑनलाइन प्रक्रियाद्वारे मंजुरी आदेश देण्यात आले आहेत.
शासनाने यापूर्वी टप्पा अनुदान मंजूर झालेल्या माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर केले आहे. यामध्ये 20 टक्के, 40 टक्के, साठ टक्के, ऐंशी टक्के व पूर्ण अनुदान मंजूर झालेल्या शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती. अशा शाळांकडून प्रस्ताव मागून इ ऑफिस प्रणालीद्वारे एका दिवसात दोनशे दहा शाळांना अनुदान मंजूर करण्यात आले. मंगळवारी शाळा मंजूर झालेल्या टप्पा अनुदानाचे आदेश वितरित करण्यात येणार असल्याचे समजताच मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषदेत गर्दी केली होती. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी ही प्रक्रिया पूर्ण करून नियमानुसार प्रस्ताव सादर केलेल्या 210 शाळांना एका दिवसात मंजुरी आदेश दिले.
जीएसटी कपातीनंतरही विक्रीत घट, ‘या’ कारणाने किराणा-इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र संकटात
सोलापूर जिल्ह्यात वाढीव टप्पा अनुदानासाठी सुमारे 300 शाळा पात्र ठरल्या होत्या तर बारा शाळांनी पहिल्यांदा 20 टक्के टप्पा अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते. गेल्या आठवड्यावर या प्रस्तावांची छाननी करून 210 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. उर्वरित प्रस्तावना त्रुटी लागल्या असून त्रुटी पूर्ततेनंतर त्याही शाळांना अनुदान मंजुरीचे आदेश वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले.
दिवाळी सणाच्या तोंडावर शिक्षकांना टप्पा अनुदान मंजूर झाल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने पहिल्यांदाच ही ऑफिस प्रणालीद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली. शिक्षणाधिकारी जगताप यांनी पारदर्शकपणे व मुख्याध्यापकासमक्ष पडताळणी झालेल्या प्रस्तावांची छाननी करून आदेश मंजूर केले. पहिल्यांदाच इतक्या सुलभ आणि वेगवान प्रक्रियेमुळे प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे मुख्याध्यापक खुश झाले आहेत.शिक्षणाधिकारी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकरी ढेपे, पर्यवेक्षक स्मिता नडिमेटला प्रभारी अधीक्षक अनिल जगताप यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पूरग्रस्तांना भोजनाची सोय करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी मदत करावे असे आवाहन केले आहे. माध्यमिक शिक्षण विभागानेही मुख्याध्यापक संघटनेच्या माध्यमातून निधी गोळा करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हातभार लावण्याची तयारी केली आहे.
जिल्ह्यातील सुमारे 300 माध्यमिक शाळांना टप्पा अनुदान मंजूर झाले आहे. या शाळांकडून प्रस्ताव घेऊन पात्र 210 प्रस्तावांचे आदेश ऑनलाईन वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित प्रस्तावांची त्रुटी पूर्तता झाल्यानंतर आदेश देण्यात येतील.
सचिन जगताप,
माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर