राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भाषण केले (फोटो - सोशल मीडिया)
परभणी : आयपीसीसीच्या अंदाजानुसार २०३० नंतर हवामानात मोठा बदत होईल, या बदलांचा परिणाम मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. हे सर्व येण्याआधीच त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित प्रतिपादन राज्य कृषिमूल्य आयोचा विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अर्थशास्त्र विभागाच्या “पिक लागवडोचा खर्च योजना या अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान विकास आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने विचारमंथन बैठक दि.१ नोजोबर रोजी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्रमणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.
विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची समिती गठीत करणार
या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. यावेळी कृषि परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्य जनार्दन कातकडे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य तसेच सर्व विभाग प्रमुख आणि विद्यापीठाच्या विविध संशोधन योजनांचे प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्रमणि म्हणाले की, मान्सूनचे अचूक अनुमान करणे कठीण असल्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना आखणे आवश्यक आहे. पुढे त्यांनी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची एक तज्ज्ञ समिती गठित करण्यात येईल. ही समिती राष्ट्रीय पातळीवरील शिफारसी तयार करील.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अखंड गंभीर समस्या
राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले की, जागतिक हवामान बदल ही एक अखंड आणि गंभीर समस्या असून देशातील सर्व वरिष्ठ वैज्ञानिक संस्थांनी याबाबत इशारा दिला आहे. पूर्वी नक्षत्रानुसार पर्जन्यमान पडत असे आणि त्याचा पिक उत्पादनावर अनुकूल परिणाम होत असे, परंतु सध्या असे होत नाही. सरासरी तापमानात वाढ, अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ यांसारख्या घटकांनी हवामानातील स्थिरता आणि पारंपारिक पद्धतींचा पाया डळमळीत केला आहे. त्यामुळेच “न्यू नॉर्मल (New Normal) महणजेच “नवीन सामान्य” ही संकल्पना उदयास आली आहे. आता विजांचा कडकडाट, अतिवृष्टी, ढगफुटी आणि पूर है सर्वसामान्य झाले आहेत, ण्हीच आजची खरी समस्या आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तयारी ठेवणे आवश्यक
या परिस्थितीला स्वीकारून त्यासाठी तयारी ठेवणे आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेती व्यवसाय शाश्वत ठेवण्यासाठी हवामान अनुकूल आणि कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. पुढे ते म्हणाले की, यासाठी कायमस्वरूपी कृती आराखडा तयार करून ठोस उपाययोजना कराव्या लागतील. या दिशेने प्रारंभ या विद्यापीठातून व्हावा आणि पुढे राष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा व चर्चासत्रांच्या माध्यमातून यावर सखोल विचारमंथन व्हावे, असे आवाहन त्यांनी कैले. विभाग प्रमुख सचिन मौरे यांनी या बैठकीचे प्रस्ताविक मांडले. त्यांनी सांगितले की, या विषयावर शेतकऱ्यांसाठी लवकरच राष्ट्रीय परिसंवाद या विद्यापीठात आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत सर्वानुमते नमूद करण्यात आले की, आसमानी संकट ही आता अपवादात्मक नव्हे तर नित्याचीच सर्वसाधारण बाब बनली आहे.






