मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर मलिक फेब्रुवारी 2022 पासून तुरूंगात होते. गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी कथित संबंध असल्याच्या प्रकरणात ईडीने कारवाई केली होती.किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मलिकांना ऑगस्ट 2023 मध्ये जामीन देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने आता मलिकांच्या जामीनाला 6 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिली आहे. वैद्यकीय आधारावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मलिकांना आधी दिलेल्या जामीनाचा कालावधी संपुष्टात येताच नवाब मलिक यांच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण देत अंतरिम जामीन वाढवून मिळावा अशी मागणी केली. नवाब मलिक यांच्या मुत्रपिंडाच्या आजाराबाबत तसेच त्यांच्या वैद्यकीय अहवालाबाबतचे तपशीलही न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आला होता. त्यानंतर खंडपीठाने मलिकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्याने अंतरिम जामिनाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता.
Web Title: Supreme court gives big relief to nawab malik bail granted for 6 months in money laundering case nrdm