दत्तात्रय भरणे
इंदापूर : इंदापूर तालुक्यामधील २५१५ योजनेमधील सुमारे ८ कोटी ५ लाख रुपये निधीच्या एकूण ३४ कामांवरील स्थगिती उठवण्यात आल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी (दि.२९) दिली.
स्थगिती देण्यात आलेल्या कामांसंदर्भात गेली एक वर्ष राज्यसरकार कडे सातत्याने पाठपुरवठा करत होतो. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमांतून व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे सदरील कामांवरील स्थगिती उठवण्यास यश आले.सदर कामांची निविदा प्रकिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले असल्याचे आ.भरणे यांनी सांगितले.
स्थगिती उठविलेल्या कामांची यादी खालील प्रमाणे :
सणसर ते रायते मळा खटके वस्ती ते सणसर रस्ता करणे ग्रामा २६६ या रस्त्यासाठी १ कोटी ४० लाख , डिकसळ योगेश्वरी लिफ्ट दशक्रिया विधी घाट रस्ता ग्रामा १३७ या रस्त्यासाठी ६० लाख रुपये,रुई बाबीर देवस्थान येथील मंदिर परिसरात सुशोभीकरण करणे, संरक्षण भिंत बांधणे ७५ लाख, निमगाव केतकी येथील जय हनुमान तालीम येथे व्यायाम शाळा बांधणे २० लाख, कळाशी येथील काळभैरवनाथ विद्यालय इमारत बांधकाम करणे २५ लाख, शेळगाव येथील मुस्लिम दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे १५ लाख, लाखेवाडी येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ येथे वर्गखोल्या बांधकाम करणे २५ लाख, आजोती येथे व्यायाम शाळा इमारत बांधणे ८ लाख, वालचंदनगर येथील राजदत्त उबाळे अनुसूचित जाती केंद्रीय प्राथमिक निवासी शाळा इमारत बांधणे २० लाख, वडापुरी मुस्लिम समाज दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे २० लाख, काझड अंतर्गत नाना सखाराम नरोटे वस्ती ते काझड सणसर रस्ता करणे १५ लाख, भाटनिमगाव शेख फरीद बाबा दर्गा मस्जिद परिसरात बांधकाम करणे २० लाख, निमगाव केतकी बाजारपेठ सुशोभीकरण करणे १५ लाख, अंथूर्णे येथील जैन मंदिर सभागृह बांधणे १२ लाख , व्याहळी येथे भैरवनाथ मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधणे २० लाख, कळाशी मुस्लिम समाज मंदिर बांधकाम करणे १० लाख, अंथूर्णे येथील शरदनगर येथे सभामंडप बांधणे ५ लाख , भरणेवाडी येथील बिरोबा मंदिर समोर पेवर ब्लॉक बसविणे १० लाख, अंथूर्णे येथील वाघ वस्ती येथे रस्ता करणे २० लाख, भरणेवाडी येथील बिरोबा मंदिर परिसरात काँक्रिटीकरण करणे २५ लाख, निमसाखर बर्गे वस्ती रस्ता करणे १५ लाख, गोतोंडी यादव वस्ती रस्ता करणे १५ लाख , माळवाडी नंबर २ कवितके वस्ती ते गाढवे वस्ती रस्ता करणे १० लाख , माळवाडी नंबर २ मोरे वस्ती शाळा ते जगताप वस्ती रस्त करणे १० लाख, निरवांगी येथे रासकर वस्ती येथे रस्ता करणे २५ लाख, मदनवाडी येथील श्री मस्कोबानाथ शिक्षण संस्था श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल मदनवाडी वर्गखोल्या बांधकाम करणे २० लाख, बावडा येथील जीवन नगर येथे रस्ता करणे २० लाख, निमसाखर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालय सांस्कृतिक सभागृह बांधणे २५ लाख,अगोती नं.१ स्मशानभूमी ते सिद्धार्थनगर रस्ता करणे २० लाख , वरकुटे बुद्रुक येथील चितळकरवाडी ते स्मशानभूमी रस्ता करणे २० लाख, करेवाडी अंतर्गत बनकरवाडी ते सातव वस्ती रस्ता करणे १५ लाख, करेवाडी अंतर्गत मराठी शाळा ते बाळू करे घर रस्ता करणे १५ लाख,वरकुटे बुद्रुक येथील आबा करे ते गोमा करे वस्ती रस्ता करणे १५ लाख,भिगवण आदर्श विद्या मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवणे २० लाख अशी एकूण ३४ कामे आहेत.