नांदेड वाघाळा महापालिकेमध्ये कर संकलन विभागाने मालमत्ता कर थकबाक वसुलीसाठी जप्ती सुरु केली (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने मालमत्ता कर थकबाक वसुलीसाठी कठोर जप्ती मोहीम सुरू केली आहे. २ फेब्रुवारीपासून ही कारवाई शहरभर राबविण्यात येत असू थकबाकीदारांवर थेट जप्ती, नळ व ड्रेनेज जोडणी खंडित करण्यासह इतर कायदेशी उपाययोजना केल्या जाणार आहेत. चालू आर्थिक वर्षात महापालिकेने १५१ कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले असले तरी जानेवारी अखेर केवळ ४३ कोटी रुपये जमा झाले आहेत.
पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी वसुलीला गती देण्यासाठी विशेष वसुली व जप्ती पथकांची स्थापना केली आहे. अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व निलेश सुकेवार यांच्याकडे प्रत्येकी तीन क्षेत्रीय कार्यालयांचे नियंत्रण सोपविण्यात आले आहे. प्रत्येक झोनमध्ये ८ ते ९ कर्मचाऱ्यांची पथके कार्यरत असून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दैनंदिन कारवाईचा अहवाल उपआयुक्त स. अजितपालसिंघ संधु यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
हे देखील वाचा : मावळात निवडणूक विभाग सतर्क! नाकाबंदीत सात लाखांची देशी दारू जप्त, एकास अटक
नागरिकांनी कारवाई टाळावी डॉ. डोईफोडे
या मोहिमेअंतर्गत अशोकनगर झोनमध्ये पहिली ठोस कारवाई करण्यात आली.
क्षेत्रीय अधिकारी राजेश जाधव यांच्या पथकाने हनुमानगड येथील सरोजा व विमल सुन्नेवार यांच्या दोन व्यावसायिक दुकानांना सील ठोकले. या मालमत्तांवर एकूण १.०६ लाख रुपयांची थकबाकी होती व वारंवार नोटीस देऊनही भरणा करण्यात आला नव्हता. महापालिकेने स्पष्ट केले की मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा मुख्य आधार असून या निधीतून पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व नागरी सुविधा राबविल्या जातात. लवकरच सर्व थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर कोणतीही स्वीकारली जाणार नाही. तक्रार त्यामुळे नागरिकांनी थकीत कर तात्काळ भरून जप्तीची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
हे देखील वाचा : हिंगोली जिल्ह्यात गन्हेगारीचा आलेख उंचावतोय; ठोस पाऊले उचलण्याची नागरिकांची मागणी
सुपर स्पेशालिटीसाठी कार्यवाही
नांदेड (वा.) येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ब्लॉक, ट्रॉमा केअर सेंटर व बर्न इज्युरीज (लेव्हल-२) युनिट उभारण्यासंदर्भात पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांना दिले. सोमवारी संसद भवनात झालेल्या भेटीत खा. चव्हाण यांनी नांदेडच्या आरोग्य सुविधांच्या विस्ताराची गरज ठामपणे मांडली. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दरवर्षी १५० पदवीपूर्व व १०७ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून १,०८० खाटांचे सुसज्ज रुग्णालय कार्यरत आहे. आयसीयू, एनआयसीयू, पीआयसीयू, आधुनिक प्रसूती कक्ष, १५ मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष, प्रगत अपघात विभाग व मेट्रो ब्लड बैंक अशा अद्ययावत सुविधा येथे उपलब्ध आहेत. मराठवाड्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा राज्यांतील रुग्णही मोठ्या प्रमाणावर या रुग्णालयावर अवलंबून आहेत.
सुपर स्पेशालिटी ब्लॉक व ट्रॉमा केअर सेंटर उभारल्यास हृदयरोग, कर्करोग, मेंदूविकार व गंभीर अपघातग्रस्त रुग्णांना स्थानिक पातळीवर उच्च दर्जाचे उपचार मिळतील, असे खा. चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल केंद्राकडे सादर करण्यात आला असून त्यास तातडीने मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली. यावर मंत्री नड्डा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव जलदगतीने मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देणार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील आरोग्यसेवेला नवी उभारी






