ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे: कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कळवा येथे आयोजित केलेल्या “जनता दरबाराबाबत विरोधी पक्षनेते रोहिदास मुंडे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. रोहिदास मुंडे जनता दरबारावर टीका म्हणाले की, या सगळ्या दरबाराचा गाजावाजा केला जात असताना, दिव्यात मात्र मागील अकरा वर्षांत एकदाही जनता दरबार भरलेला नाहीही वस्तुस्थिती किती त्रासदायक आणि दु:खद आहे, हे आज प्रत्येक दिवेकराला प्रकर्षानं जाणवत आहे अशी खंत कल्याण ग्रामीण विभाग विधानसभा प्रमुख ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
दिवा विभागातील जनता आजही मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे.हॉस्पिटल नाही,गार्डन नाही,तलाव मृत अवस्थेत,आणि पाण्याची टंचाई, अनधिकृत बांधकामे, कचऱ्याचा प्रश्न, वीज पुरवठा या समस्यांनी सामान्य जनतेचं जगणं असह्य केलं आहे. दिवा भागातील नागरिकांना पायाभूत सुविधांसाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. या सततच्या आव्हानांना नागरिक सामोरे जात आहेत. या अशा गंभीर पार्श्वभूमीवर, कळवा येथे ‘जनता दरबार’ घेऊन फोटोंमध्ये बुडालेलं लोकप्रतिनिधित्व हे दिवेकरांसाठी फक्त थट्टा वाटतेय. कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
जनता दरबार कलवा,डोंबिवली,उल्हासनगर येथे केले जाते मग दिव्यातल्या जनतेचे प्रश्न खासदार कधी सोडवणार ? असा खोचक सवाल देखील रोहिदास मुंडे यांनी श्रीकांत शिंदे यांना केला आहे. मुंडे पुढे असंही म्हणाले की, “खासदार साहेब, दरबाराचा लोकशाहीत सन्मान आहे, पण तो दरबार जर “जनतेसाठी” नसून “प्रचारासाठी” घेतला जात असेल, तर त्याचं रूपांतर केवळ नाट्यशैलीतील दिखाव्यात होतं. दिव्यातील नागरिक विचारतात दिवा शहर तुमच्या मतदारसंघातच आहे ना? मग इथं दरबार कधी होणार? की दिवा शहर तुमच्या नकाशातूनच गायब झालंय?जनतेच्या मनात आता एकच सवाल आहे” .’कामाचा दरबार कधी, की अजूनही फक्त फोटोच?’ अशी जहरी टीका देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केली आहे.