ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे : आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास दत्तमठ जवळ, चाहुस्मृती इमारतीच्या बाजूला, साई भूषण अपार्टमेंट समोर, पाखाडी, खारेगाव, ६०-फिट रोड, कळवा, ठाणे (प.) या ठिकाणी Maruti Suzuki Wagonr Car या रोड लगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनावरती झाड पडले होते. सदर घटनास्थळी कळवा पोलीस कर्मचारी, टोरंट पॉवरचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह व ०१-जे.सी.बी. मशीनसह, अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह व ०१-फायर वाहनासह, वृक्षप्राधिकरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने चारचाकी वाहनावरती पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसामुळे ठाण्यात ठिकठिकाणी वादळी पावसाने झाडं उन्मळून पडले आहेत.पहिल्याच पावसामध्ये ठाणे शहरांमध्ये अनेक ठिकाणी झाडं पडली. यात एका २६ वर्षीय मुलाचा मृत्यू देखील झाला. या संपूर्ण मृत्यूला ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ठाणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विक्रांत तावडे व नम्रता भोसले- जाधव यांनी केला आहे. याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली असून अत्याधुनिक पद्धतीने संपूर्ण ठाणे शहरातील झाडांची तपासणी करावी व जी झाडे धोकादायक असतील त्यांना मुळा सकट काढून टाकण्यात यावे जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित हानी होणार नाही ठाणे महानगरपालिका जर करदात्यांकडून वृक्ष कर घेत असेल तर या कराच्या रकमेतून हा संपूर्ण खर्च करावा आणि संपूर्ण झाडांचे सर्वेक्षण करावे अशी मागणी या ठिकाणी या दोन्ही सदस्यांनी आयुक्तांकडे केली होती.