SUMMER ( फोटो सौजन्य - PINTEREST )
राज्यभरात सध्या उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. पुणे-मुंबईसारख्या भागातही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे राज्यभरात जिथं सर्वाधिक तापमान असतं अश्या विदर्भात तर नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाचा उष्माघाताने मृत्यूझाल्याची माहिती समोर आली होती. मृत मुलाचे नाव संस्कार सोनटक्के असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचा शाहिवासी आहे. दरम्यान या प्रकरणात वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. या अहवालातून वेगळीच माहिती समोर आली आहे.
११ वर्षाचा संस्कार सोनटक्के या मुलाचा मृत्य ऊषामाघटने झाल्याचे समोर आले होते. परंतु अहवालात मृत्यू उष्माघाताने नव्हे तर ‘मेंदूज्वर’ आजाराने झाला आहे अशी प्रतिक्रिया देखील अकोला महानगर आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष गिऱ्हे यांनी दिली आहे.
उन्हाळाच्या दिवस असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचा आवाहन डॉक्टर गिऱ्हे यांनी केलं आहे. शक्यतो उन्हाच्या वेळेस घराच्या बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, तसेच उष्माघाताची लक्षणे आढळ्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय मदत घ्यावी असं आवाहन अकोला महानगर आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष गिर्हे यांनी अकोलाकारांना केलं आहे.
उन्हाळ्यात ‘हे’ ड्रिंक पिऊ शकता..
उन्हाळ्याने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. उष्ण हवामान आणि कडक उन्हामुळे लोक डिहायड्रेशनला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, उष्णतेपासून बचाव करण्यासाठी, भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. तसेच, तुमच्या आहारात काही हेल्दी समर ड्रिंक्सचा समावेश करा, जे तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवतील. समर ड्रिंक्स अनेक प्रकारे बनवले जाते मात्र आज आम्ही तुम्हाला चिया सीड्स आणि गोंड कटिरापासून तयार होणारे एक समर ड्रिंक सांगणार आहोत जे शरीराला थंड करण्यासोबतच तुमच्या आरोग्याच्या समस्याही दूर करेल. गोंड कटिरा हा एक डिंकाचा प्रकार आहे, बाजारात तुम्हाला तो सहज उपलब्ध होईल. हे ड्रिंक प्यायल्याने तुम्ही दिवसभर उर्जेने भरलेले राहालच पण तुमचे वाढते वजनही कमी होईल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हे ड्रिंक तयार करण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि झटपट ते बनून तयार होते. चिया बिया आणि गोंड कटिरा यांचे पेय कसे बनवायचे, साहित्य आणि कृती काय जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.