File Photo : Winter
जळगाव : राज्यात गारठा वाढायला सुरुवात झाली आहे. आठवडाभरापूर्वी राज्यात उष्णता जाणवत होती. मात्र, आता पुन्हा थंडीची लाट आली असून, मंगळवारी जळगाव, नंदुरबार गारठले. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला होता. जळगावमध्ये राज्यात सर्वात कमी 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर नंदुरबारमध्ये किमान तापमान 9.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.
हेदेखील वाचा : अशोक रुईया मेमोरियल हिवाळी राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेत टीम मान्यवर आणि टीम ॲक्वेरियस अव्वल स्थानावर
पनवेल, ठाणे, नवी मुंबईत मुंबईच्या तुलनेत जास्त थंडी असते. मात्र, सोमवारी ठाण्यापेक्षाही मुंबईत जास्त थंडी जाणवली. मुंबईचा किमान तापमानाचा पारा पहिल्यांदाच 20 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवला. मुंबई शहरात 19.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले, तर ठाण्यात 20 अंश सेल्सिअस दिसून आले. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी 19.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे 13.7 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे तापमान रविवारच्या तुलनेत 3.5 अंशांनी कमी आहे.
दरम्यान, रविवारच्या तुलनेत तापमान कमी तर मुंबई उपनगरात 13.7 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा घसरला. तर सांताक्रूझ केंद्रात मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.
राज्यात सांताक्रुझमध्ये 5.1 अंशची घसरण
गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ झाल्याचे चित्र राज्यात होते. फेंगल चक्रीवादळामुळे हवामानाचे गणित बिघडले. मात्र, आता पुन्हा थंडीला सुरूवात झाली असून, राज्यात तुलनेत सर्वात जास्त पारा सांताक्रुझ केंद्रावर घसरल्याची नोंद करण्यात आली.
जळगावात सर्वात कमी तापमान
राज्यामध्ये सर्वात कमी तापमान जळगावमध्ये नोंदवण्यात आले. परंतु, सरासरीपेक्षा 2.6 अंश सेल्सिअसने येथे घट नोंदवली. तर मुंबईतील सांताक्रुझमध्ये मात्र ही नोंद 5.1 अंश सेल्सिअसने नोंदवण्यात आली. त्यामुळे मुंबईकर पुरते गारठले होते.
हेदेखील वाचा : राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वराज शिंदेची छाप; वसईच्या खेळाडूची दमदार कामगिरी; सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई