नाशिक : नाशिकमध्ये सर्वच प्रार्थनास्थळावरील भोंग्यांना (Loudspeaker) पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार. त्यानंतर जर 3 मे नंतर प्रार्थनास्थळावर विनापरवानगी भोंगे असतील तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचे महत्वपूर्ण आदेश असून 3 मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. अन्यथा 3 मे नंतर थेट कारवाई करून भोंगे काढणार असल्याचं आदेशात म्हटलंय. मुस्लिम धर्मियांना देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर हनुमान चालीसा लावायची असल्यासही पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. अजान पूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मिटर लांब हनुमान चालीसा लावता येईल. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार धार्मिक स्थळी कोणत्याही कार्यक्रमासाठी भोंगे लावायचे असल्यास परवानगी आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा, असे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यानंतर राज्यभरात मनसैनिकांनी मशिदसमोर भोंगे लावले होते. तर काही ठिकाणी प्रशासनाने हस्तक्षेप करत मनसैनिकांना रोखलं, नाशकात मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा इफेक्ट दिसून आल्याचं बोललं जातंय.
[read_also content=”नाशिक पोलीस आयुक्तालयाने काढलेल्या आदेशानुसार, ध्वनीक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि त्याअनुषंगाने राज्य सरकारचे आदेश यानुसार, आवाजाची पातळी ठरवण्यात आली आहे. या आवाजाची पातळी औद्योगिक, निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भोंगे असलेल्या प्रार्थनास्थळांना आवाजाची पातळी ठरवावी लागणार
आहे. https://www.navarashtra.com/maharashtra/shiv-sena-mla-mangesh-kudalkars-wife-commits-suicide-nrps-270326.html”]
नाशिक पोलीस आयुक्तालयाने काढलेल्या आदेशानुसार, ध्वनीक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि त्याअनुषंगाने राज्य सरकारचे आदेश यानुसार, आवाजाची पातळी ठरवण्यात आली आहे. या आवाजाची पातळी औद्योगिक, निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भोंगे असलेल्या प्रार्थनास्थळांना आवाजाची पातळी ठरवावी लागणार आहे.
[read_also content=”लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा आणि अजान नाही तर वेगळचं काही तरी लावलं; वादात नवा ट्विस्ट https://www.navarashtra.com/india/inflation-witch-between-ajan-hanuman-nrvk-270294.html”]