लोणावळा : कार्ला येथील एकविरा गडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्याने या रस्यावर अपघाताचा धोका वाढला आहे. रविवारी या रस्त्यावर चारचाकी गाडी बंद पडली. मात्र, रस्त्याला साईड पट्टी नसल्याने चारचाकी रस्त्यालगत घेणे अशक्य झाल्याने या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
नवरात्री उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक कार्ला येथील प्रसिद्ध एकविरा देवीच्या दर्शनासाठी येतात. शिवाय प्रत्येक विकेंडला येथे भाविकांसह पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, पुणे -मुंबई महामार्गापासून एकविरा गडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्याने किरकोळ अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर तातडीने साईडपट्ट्या तयार करण्याची मागणी भाविकांकडून करण्यात आली आहे.