Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कर आकारणीचे अधिकार काढले

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कर आकारणीचे अधिकार काढले आहेत. आठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत तीन वर्षांपासून सुरू असलेली करआकारणी व कर संकलनाचे काम आता पुन्हा सहायक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले आहे. याबाबतचा आदेश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी काढला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2022 | 04:02 PM
महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कर आकारणीचे अधिकार काढले
Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कर आकारणीचे अधिकार काढले आहेत. आठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत तीन वर्षांपासून सुरू असलेली करआकारणी व कर संकलनाचे काम आता पुन्हा सहायक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले आहे. याबाबतचा आदेश आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी काढला आहे.

शहरात ५ लाख ७७ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्तांना महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरातील इमारत व जमिनीवर मालमत्ताकराची आकारणी व वसुली करण्याची कार्यवाही करण्यात येते. महापालिकेच्या ३१ जुलै २०१९ रोजीच्या आदेशानुसार, शहरातील १७ करसंकलन विभागीय कार्यालयांचे कामकाज हे आठ क्षेत्रीय अधिकारी आणि कर संकलन मुख्य कार्यालय व करसंकलन विभागाच्या सहायक आयुक्तांच्या यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तथापि, विभागीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये आणि मुख्य कार्यालये यांची बैठक व्यवस्था, नियंत्रणाची विविध ठिकाणे, करआकारणी व करवसुली कामकाजावर विविध अधिकाऱ्यांचे नियंत्रण, तसेच कामकाजातील समन्वयाचा व एकसूत्रीपणाचा अभाव यातून नागरिकांच्या कामात होणारा विलंब आदी बाबी विचारात घेऊन कर आकारणी व कर संकलन विभागाचे कामकाज एकत्रीकरण करणे आवश्‍यक आहे.

[read_also content=”तोतया पोलीस बनून लोकांची फसवणूक; पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://www.navarashtra.com/maharashtra/cheating-people-by-pretending-to-be-policemen-the-police-beat-the-shackles-nrdm-314864.html”]

निर्णय प्रक्रियेतील सध्याचे पाच ते सहा टप्पे कमी करून दोन ते तीन टप्पे ठेवल्यास सर्व सेवा जलद देण्यास मदत होईल. क्षेत्रीय कार्यालयातील वाढता कामाचा व्याप लक्षात घेता, त्यांना कर संकलनासारख्या महत्त्वाच्या बाबींकडे वेळ देणे शक्‍य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेचा ३१ जुलै २०१९ रोजीचा कर संकलन विभागाच्या कामकाजाच्या विकेंद्रीकरणाचा आदेश रद्द करण्याचा निर्णय आयुक्त पाटील यांनी घेतला आहे. तसेच कर आकारणी व करसंकलन विभागाची रचना व कामकाज कार्यपद्धती निश्‍चित केली आहे. त्यानुसार विभागप्रमुख, सहायक आयुक्त, प्रशासन अधिकारी आणि कार्यालय अधीक्षक तथा सहायक मंडलाधिकारी यांचे कामकाजाचे स्वरूप निश्‍चित करण्यात आले आहे.

Web Title: The taxing powers of municipal zonal officers were removed nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 04:02 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Pimpri
  • pune news
  • Rajesh Patil

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा
2

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?
3

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
4

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.