केशवनगर परिसरातील विरांश वाईन्स शॉपी फोडून पसार झालेल्या सराईत चोरट्यांना मुंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून ३३ हजारांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या चोरट्यांचे दोन साथीदार पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
पुणे : केशवनगर परिसरातील विरांश वाईन्स शॉपी फोडून पसार झालेल्या सराईत चोरट्यांना मुंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून ३३ हजारांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या चोरट्यांचे दोन साथीदार पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
ओंकार उर्फ पल्या सुधाकर परमवार (वय २४, रा. जुनाबाजार, खडकी), अरबाज मुनीर शेख (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक महेश बाळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदिप जोरे, संतोष जगताप, सचिन पाटील, स्वप्नील रासकर यांच्या पथकाने केली आहे.
शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बंद फ्लॅटसोबतच चोरटे दुकाने देखील फोडू लागले आहेत. यादरम्यान, केशवनगर भागातील बंद असलेली विरांश वाईन्स शॉपी अज्ञातांनी फोडली होती. तेथून विदेशी दारूच्या बॉटल्स तसेच रोकड असा ४ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू होता.
पोलिसांनी १५ तासांमधील तब्बल परिसरात असलेले २५० सीसीटीव्ही पाहिले. तसेच, खबऱ्यामार्फत देखील चोरट्यांचा शोध सुरू केला होता. तेव्हा पोलीस अंमलदार सचिन पाटील व स्वप्नील रासकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शॉपी फोडणारे आरोपी खडकी बाजार येथे येणार आहेत. त्यानूसार, पथकाने याठिकाणी सापळा रचला. दोघे संशयित येताच त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. ओंकार व अरबाज यांनी त्यांच्या इतर दोन साथीदाराना घेऊन वॉईन शॉपी फोडली असल्याचे सांगितले.या दोघांकडून पोलिसांनी ३३ हजारांची विदेशी दारू जप्त केली आहे.
दारू विक्रीसाठी वॉईन शॉपी फोडली..
ओंकार आणि अरबाज हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदारांनी दारू विक्री करण्यासाठी वॉईन शॉपी फोडली असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.
Web Title: Thieves who broke into wine shop handcuffed mundhwa police action confiscation of foreign liquor nrdm