मुंबई – कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या काही गावांवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला असून, त्यामुळं महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे. दरम्यान, सीमाप्रश्नांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारवर हल्लोबल केला आहे. सीमा भागातील बांधवांना हे सरकार न्याय देईल असे वाटत नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दोन्ही राज्यात भाजप सत्तेत आहे. आपले मंत्री दोन तारखा देऊन दौरा रदद करतायत हे डरपोक सरकार आहे. हे सीमा भागातील नागरिकांना न्याय देऊ शकणार नाहीत. बोम्मई व फडणवीस हे तू मारल्यासारख कर मी रडल्यासारख करतो असं सर्व सुरू आहे. असं दानवेंनी टिका केलीय. संजय राऊत यांनी अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. छत्रपतींचा अवमान करण्याचा अजेंडाच भाजपचा आहे. महाराष्ट्रात लहान मुलगाही सांगेल महाराजांचा जन्म कुठे झाला. शिवशक्ती व भीमशक्ती ही एकत्र यावे ही बाळासाहेबांची इच्छा होती. जर त्यादृष्टीने पाऊल पडत असतील तर आनंद आहे.
नीती आयोगाच्या धर्तीची स्थापन मनमोहन सिहं यांनी ज्या उद्देशान स्थापन केली. त्यात महाराष्ट्राच्या भविष्याचे व्हिजन असायला हवे. मात्र बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे असे काय व्हिजन आहे. आशिष शेलार यांनीच या व्यक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. शिंदेंचे अनेक मिटिंगही तेच बघतात. यावरून कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र असा प्रश्न उपस्थित होतो. फडणवीस यांची कूकरेजाची जवळकीता ही खूप काही सांगून जाते. फडणवीस काय आणि शिंदे काय यांना सर्व सामान्यांची काहीही पडलेली नाही. अशी शिंदे-फडणवीस यांच्यावर दानवेंनी टिका केलीय.