नागपूर : हिवाळी अधिवेशनातील आज अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे तर, उद्या अधिवेशनचा शेवटचा दिवस असल्यामुळं, उद्या सूप वाजणार आहे. हे अधिवेशन अनेक कारणांमुळं वादळी ठरत आहे, सीमावाद, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, राहुल शेवाळे, मंत्र्यांचे घोटाळे तसेच अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक हो, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येताहेत. दरम्यान, अधिवेशनाच्य पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक होत सरकारच्या विरोधात आंदोलन करताहेत. दरम्यान, आज देखील विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
[read_also content=”मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संघ मुख्यालय भेटीचा अन्वयार्थ काय? शिंदे शिवसैनिक की स्वयंसेवक? शिंदेंना हायजॅक करतायेत का? https://www.navarashtra.com/maharashtra/what-is-the-significance-of-chief-minister-eknath-shinde-visit-to-rss-office-shinde-shivsainik-or-swayamsevak-357778.html”]
महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका… खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके माजलेत बोके… शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान… कुणी उद्योग घ्या, कुणी सबसिडी घ्या तुम्ही खोके घ्या… अशा घोषणा देत आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आज हिवाळी अधिवेशनाचा नववा दिवस असून गायरान जमीन आणि उद्योगमंत्र्यांनी केलेल्या अजब उद्योगाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली नववा दिवसही आमदारांनी ईडी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात गाजवून सोडला. अनुदान वाढीव टप्प्यासाठी व इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अरुण अण्णा लाड यांनी आंदोलन केले.