मुंबई : जे तरुण पोलीस भरती होण्याचे स्वप्न पाहतात, त्यांच्यासाठी महत्त्वाची व कामाची बातमी समोर येत आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती (Mumbai Police Force Contract Recruitment 2023) करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. पण कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत (Maharashtra State Security Corporation) कंत्राटी पद्धतीनं (Contract Method) जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. (three thousadn contract police recruitment in mumbai police force big decision of home department why contract method questions from young people)
किती कालावधीसाठी भरती…
दरम्यान, मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही कंत्राटी पोलीस भरती करण्यात येणार आहे. तसेच मनुष्यबळाची टंचाई असल्यानं तब्बल 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. तर राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
100 कोटी 21 लाख रुपयांची तरतूद
मुंबईत विविध जाती धर्माचे सण, उत्सव असले की, पोलिसांवर ताण येतो. तसेच गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, रमजान आदी सणासुदीच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही पोलीस भरती करण्यात येत आहे. यासाठी 100 कोटी 21 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.