Photo Credit- Social Media स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार
मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. महायुतीने 230 जागा मिळवल्या तर महाविकास आघाडीने 49 जागा मिळवल्या. राज्यभरात ईव्हीएम विरोधात विरोधकांसह अनेकांनी आवाज उठवला आहे. बॅलटपेपवर मतदान घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नेतेच नव्हे तर राजकीय पत्रकार, विश्लेषक ईव्हीएम विरोधात आवाज उठवू लागले आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणूक आणि ईव्हीएमबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच काठमांडू येथे शहरी नक्षलवाद आणि ईव्हीएमबाबत सभागृहाला माहिती देताना झालेल्या बैठकीचा उल्लेख केला होता.निवडणुकीपूर्वी 12 ते 14 नोव्हेंबर 2023 दरम्यान काठमांडूच्या कांतीपूर भागात माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक विशेषत: माओवाद्यांच्या टॉप कमांडरची होती. या बैठकीत भारत, नेपाळ, बांगलादेश आणि मणिपूर येथील माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य सहभागी झाले होते. या बैठकीत महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली.
Weather Forecast: काश्मीर – लडाख थंडीचे थर्ड डिग्री टॉर्चर, -22 डिग्रीवर पारा उतरला
महाराष्ट्रातून चार ते पाच जणांचा समावेश
या सभेला महाराष्ट्रातील किमान चार ते पाच जण उपस्थित होते,त्यात एका प्रमुख विचारवंताचाही समावेश होता.हा विचारवंत भारत जोडो मोहिमेशी संबंधित होता. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या या मोहिमेत त्यांचा सक्रिय भाग होता.महाराष्ट्राच्या निवडणुकीदरम्यानही या व्यक्तीने संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन करून सरकारविरोधी घोषणाही दिल्या होत्या.
माओवाद्यांनी धक्कादायक पावले उचलण्याच्या सूचना
काठमांडू बैठकीनंतर माओवाद्यांना पुढील पावले उचलण्याच्या नव्या सूचना देण्यात आल्या.विशेषतः महाराष्ट्रात आणि देशभरात ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभारण्याची योजना आखण्यात आली होती. या आंदोलनाची चार टप्प्यात विभागणी करून अंमलबजावणी करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
पहिला टप्पा – मीडिया आणि समाज माध्यमातून ईव्हीएमवर संशय निर्माण करून आरोप केले जातील जेणेकरून लोकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होईल.
दुसरा टप्पा – महाराष्ट्राबरोबरच इतर राज्येही ईव्हीएमविरोधात आवाज उठवतील आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करतील.
जर्मनीत ऐन ख्रिसमस दरम्यान मोठी दुर्घटना; एका व्यक्तीने डझनभर लोकांना चिरडले,
तिसरा टप्पा – महाराष्ट्रात महाआघाडी सरकारवर नाराज असलेल्या समाजातील विविध घटकांना, विशेषत: मुस्लीम, दलित आणि ओबीसी समाजाला रस्त्यावर उतरवून सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण केले जाईल.
चौथा टप्पा – शेवटी, आंदोलनाला हिंसक बनवण्याची योजना आहे ज्यामध्ये सरकारच्या विरोधात रस्त्यावरील लढाई सुरू केली जाईल आणि अराजकतेचा आरोप केला जाईल.
काठमांडूमध्ये झालेल्या या बैठकीनंतर माओवाद्यांच्या प्रमुख कमांडर्सनी त्यांच्या कार्यकर्त्यांना या धोरणात्मक सूचनांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. यावरून आगामी काळात महाराष्ट्र आणि देशातील राजकीय वातावरण प्रभावित करण्याचा मोठा कट माओवाद्यांकडून रचला जात असल्याचे स्पष्ट होते.