आजच्या ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर
02 Oct 2025 12:40 PM (IST)
डोंबिवली येथून एक मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. जास्त परताव्याचे आमिष दाखवून १०० हुन अधिक सामान्य गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या फिनिक्स इन्व्हेस्टमेंट’ (Phoenix Investment) प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने (EOW) चार मुख्य आरोपींना अटक केली आहे. तर अन्य चार आरोपी फरार आहे त्यांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी फसवणुकीची एकूण रक्कम ४ ते ५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
02 Oct 2025 12:30 PM (IST)
पुण्यातील गुंड निलेश घायवळने खोटा पत्ता दाखवून पासपोर्ट मिळवून स्वित्झर्लंडला पळाला. पोलिसांनी त्याच्या बँक खाती गोठवली असून, संपत्तीचा शोध पोलीस करत आहे.
02 Oct 2025 12:20 PM (IST)
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना कथित ड्रग्स प्रकरणात अटक झाली होती. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टनुसार त्यांनी ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना जामीन मिळाला आहे.
02 Oct 2025 12:10 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चिमुरड्याचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पाच कोटींच्या खंडणीसाठी ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातल्या आरोपींना दुहेरी जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाने अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. तीच शिक्षा औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवली आहे. आरोपींवर कलम 302 म्हणजे हत्या आणि कलम 364 म्हणजे पैशासाठी अपहरण या कलमांतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. वर्धनचे वडील बांधकाम व्यावसायिक होते. आणि मुंबईत त्यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
02 Oct 2025 11:49 AM (IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच स्थापना 1925 साली डॉ. हेडगेवार यांनी केली होती. आज संघाला 100 वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने रेशीमबाग येथे मोठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोंविद हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले असून हजारो स्वयंसेवकांनी यामध्ये सहभाग घेतला
02 Oct 2025 11:47 AM (IST)
"शाखा उपक्रमांमध्ये नियमित सहभाग घेऊन, स्वयंसेवक त्याचे व्यक्तित्व (व्यक्तिमत्व), कर्तृत्व (कर्तेत्व), नेत्रत्व (नेतृत्व), समाजदारी (ज्ञान) आणि भक्ती (भक्ती) विकसित करतो, अशा भावना मोहन भागवत यांनी संघशताब्दी कार्यक्रमातून व्यक्त केल्या.
"Through regular participation in Shakha activities, a swayamsevak develops his vyaktitv (Personality), kartrutv ( doership), netrutv (Leadership), Samajhdaari ( Wisdom ) & Bhakti (Devotion)."- Dr Mohan ji Bhagwat. #RSS100Years https://t.co/UIbKUnFt6A pic.twitter.com/Fiq2MnLYJ7
— RSS (@RSSorg) October 2, 2025
02 Oct 2025 11:46 AM (IST)
"आपल्या एकतेचा आधार आपली भारतीय संस्कृती आहे. ती सर्वसमावेशक आहे. आपली संस्कृती सगळ्यांचा सन्मान व स्वीकार करण्याची शिकवण देते. संस्कृतीचं जतन सनातन काळापासून आजपर्यंत इथल्या हिंदू समाजाने केलं आहे, त्यामुळे कधीकधी त्या संस्कृतीला हिंदू संस्कृतीही म्हटलं जातं. भारतात या संस्कृतीला आवश्यक समृद्ध व सुरक्षित वातावरण मिळाले. पिढ्यानपिढ्या ही संस्कृती जतन व संवर्धन करण्यासाठी आपल्या पूर्वजानी कष्ट घेतले आहेत, त्याग केला आहे, बलिदान दिलं आहे. त्या संस्कृतीचे आचरण, आपल्या पूर्वजांचा गौरव, विवेकपूर्ण आचरण व आपल्या मातृभूमीची भक्ती हे सगळे मिळू आपले राष्ट्रीयत्व तयार होतं," अशा भावना आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शताब्दीवर्षानिमित्त व्यक्त केल्या आहेत.
02 Oct 2025 11:22 AM (IST)
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अहिंसेची लढाई लढणारे महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. गांधीचे विचार आणि त्यांची जीवनशैली आजही जगाला प्रेरणा देतात. गांधीजींना आपल्या देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य देशाला समर्पित केले होते. उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटीश सरकरापुढे मोठे आव्हान निर्माण केले होते. आज संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात गांधी जयंती साजरी केली जात आहे.
02 Oct 2025 10:54 AM (IST)
बिग बॉसच्या फॅन पेज “बिग बॉस तक” नुसार, घरातील कॅप्टनसी टास्क रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर, बिग बॉसने घोषणा केली की कॅप्टनसी टास्क रद्द झाल्यामुळे, या आठवड्यातही घराचा सध्याचा कॅप्टन कॅप्टन असेल. याचा अर्थ फरहाना भट्ट पुन्हा एकदा घराची कॅप्टन बनली आहे. फरहाना ही या हंगामात सलग दोनदा कॅप्टनशिप सांभाळणारी पहिली स्पर्धक आहे.
02 Oct 2025 10:43 AM (IST)
२ ऑक्टोबर, गांधी जयंती आणि दसरा या दिवशी अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले, ज्यामुळे मोठी टक्कर झाली. चाहते दोन्ही चित्रपटांवर प्रचंड प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ऋषभ शेट्टीचा “कांतारा चॅप्टर १” प्रेक्षकांमध्ये लक्षणीय चर्चा निर्माण करत असताना, वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा “सनी संस्कार की तुलसी कुमारी” देखील मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळवत आहे. चित्रपटाची कथाच नाही तर दोन्ही स्टार्समधील केमिस्ट्री देखील मने जिंकत आहे. तर, चित्रपटाच्या कामगिरीवर आणि त्याला खास बनवणाऱ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
02 Oct 2025 10:34 AM (IST)
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताच्या हाती चौथी विकेट पहिल्या सेशनमध्ये लागले आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्या सेशनमध्ये विकेटचे हॅट्रिक घेतले आहे. मोहम्मद सिराज में या सामन्यात पहिल्या सेशनमध्ये वेस्ट इंडिजच्या तीन फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
02 Oct 2025 10:32 AM (IST)
राज्यात एकनाथ खडसे यांच्या जावयांना अटक केल्यानंतर खडसे परिवारावर आरोप करण्यात येत होते . प्रांजल खेवलकर यांना कथित ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. खराडीतील एका खाजगी ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ड्रग्सच सेवन केल्याच्या आरोपाखाली प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना अटक केली होती . मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे . प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्सच सेवन केल नसल्याचं समोर आल आहे .
02 Oct 2025 10:23 AM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला मोठा धक्का बसला आहे. युएईमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लीग टी२० (ILT20) च्या चौथ्या हंगामाच्या लिलावात त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. $१२०,००० च्या मूळ किमतीसह अश्विन लिलावात सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक होता, परंतु कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यासाठी बोली लावण्यात रस दाखवला नाही. जर त्याला संघ मिळाला असता तर तो या लीगमध्ये खेळणारा तिसरा भारतीय क्रिकेटपटू बनला असता.
02 Oct 2025 10:14 AM (IST)
सध्या जगभरात अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्त्रायल गाझा पट्टीवर भीषण हल्ले करत आहे. हमासचा संपूर्ण नाश केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी स्पष्ट भूमिकाच इस्त्रायलने घेतली आहे. इस्त्रायले केवळ हमास नव्हे तर फिलीस्तीनसह अन्य काही देशांवर देखील हल्ले केले आहेत. आता थेट इस्त्रायलने आणखी एक देशाला इशारा दिला आहे.
02 Oct 2025 10:05 AM (IST)
भारत पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. आता हा वाद महिला क्रिकेटमध्ये देखील पहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे पुरुष संघाने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता, त्याचप्रमाणे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघही तेच करेल. म्हणजे, हस्तांदोलन होणार नाही, फोटोशूट होणार नाही आणि विरोधी संघाच्या खेळाडूंशी कोणताही संवाद होणार नाही.
02 Oct 2025 10:00 AM (IST)
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चिमुरड्याचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पाच कोटींच्या खंडणीसाठी ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातल्या आरोपींना दुहेरी जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाने अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. तीच शिक्षा औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवली आहे.
02 Oct 2025 09:59 AM (IST)
सध्या जगभरात अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्त्रायल गाझा पट्टीवर भीषण हल्ले करत आहे. हमासचा संपूर्ण नाश केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी स्पष्ट भूमिकाच इस्त्रायलने घेतली आहे. इस्त्रायले केवळ हमास नव्हे तर फिलीस्तीनसह अन्य काही देशांवर देखील हल्ले केले आहेत. आता थेट इस्त्रायलने आणखी एक देशाला इशारा दिला आहे.
02 Oct 2025 09:55 AM (IST)
पुण्यातील गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निलेश घायवळवर गंभीर गुन्हे असताना त्याने खोटा पत्ता देत पासपोर्ट मिळवला आणि थेट स्वित्झर्लंडला पळाला. घायवळ गँगच्या गुंडांनी काही कारण नसताना आम्ही इथले भाई आहोत म्हणत सामान्य नागरिकावर गोळीबार केला तर एकावर कोयता हल्ला करण्यात आला. मात्र या घटनेने निलेश घायवळचा पाय खोलात गेला.
Marathi Breaking Live Updates : विजयादशमीच्या सणाकडून प्रेरणा घेऊन आव्हाने, संकटावर मात करुया, असे आवाहन करतानाच, विजयादशमीचे हे पर्व राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.
विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यांच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा देतानाच, राज्यात पावसामुळे अनेक भागात अभुतपूर्व बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या संकटसमयी आपण सगळे एकजुटीने या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूया. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने, उमेदीने उभे करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन केले.