Maharashtra Breaking News
04 Sep 2025 01:45 PM (IST)
जगभरात इस्लाम धर्म मानणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र रंगवले जाते. परंतु, एक ताज्या सर्वेक्षणातून असे स्पष्ट झाले आहे की काही मुस्लिमबहुल देशांमध्ये इस्लाम सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, मुस्लिम जगाचे नेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुर्कीमध्येच सर्वाधिक लोक इस्लामपासून दुरावत आहेत. प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या या विस्तृत सर्वेक्षणात ३६ देशांचा समावेश करण्यात आला. यातून १३ देशांमध्ये इस्लाम स्वीकारणारे आणि सोडणारे लोक दोन्ही प्रकारे आढळले. या यादीत तुर्कीसह भारत, अमेरिका, सिंगापूरसारखे देशही आहेत.
04 Sep 2025 01:35 PM (IST)
नेटफ्लिक्सप्रमाणेच, व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube देखील पासवर्ड शेअरिंगवर कठोर भूमिका घेण्याची तयारी करत आहे. अलिकडच्या अहवालांवरून असे दिसून आले आहे की कंपनी अशा वापरकर्त्यांवर कारवाई करत आहे जे एकाच घरात नाहीत आणि YouTube प्रीमियम फॅमिली प्लॅनचा गैरवापर रोखण्यासाठी त्यांचा पासवर्ड तुमच्या मित्रांसोबत शेअर करून YouTube प्रीमियमचा आनंद घेत आहेत.पाहिले तर, हे पाऊल अगदी Netflix ने अलीकडेच पासवर्ड शेअरिंग थांबवण्यासाठी उचललेल्या पावलासारखे आहे. त्यामुळे आता सबस्क्राईबर्स आणि युजर्सवर थेट परिणाम होणार आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
04 Sep 2025 01:25 PM (IST)
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन नेहमीच त्यांच्या गूढ आणि गूढतेने भरलेल्या निर्णयांसाठी ओळखले जातात. जगभरातील नेत्यांना चकित करणाऱ्या त्यांच्या हालचालींमध्ये अलीकडेच एक नवीन वळण दिसत आहे ते म्हणजे त्यांच्या मुलगी किम जो आह हिला उत्तराधिकारी म्हणून पुढे आणणे. हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे कारण किमचा एक मोठा मुलगाही अस्तित्वात आहे, तरीसुद्धा त्याला न बाजूला ठेवून मुलीला समोर आणले जात आहे.
04 Sep 2025 01:15 PM (IST)
मागिल काही महिन्यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी क्रिकेटच्या अनेक फाॅरमॅटमधून सोशल मिडियावरच निवृतीची घोषणा केली होती. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा, आर अश्विन यासांरख्या दिग्गज खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. भारताचा दिग्गज खेळाडू आर अश्विनने आयपीएलमधून देखील निवृती घेतली आहे. आर अश्विननंतर, आणखी एका भारतीय फिरकी गोलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे.
04 Sep 2025 01:06 PM (IST)
राज्य सरकार कामाचे तास वाढवण्याचा विचार करत असल्याची माहिती आधीच समोर आली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात कामगार विभागाला याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. अखेर, यावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून महाराष्ट्र दिवसाचे कामाचे तास ९ वरून १२ तास करण्यात आला आहे.केंद्र सरकारच्या ease of doing business धोरणांतर्गत देशात होणारे बदल लक्षात घेता कायद्यातील उद्योग आणि कामगारांसाठी या दोन्ही घटकांसाठी महत्त्वाचे असून उदयोग क्षेत्राला आहे आणि औद्योगिक क्षेत्राला अधिक लवचिकता आणि कामगारांसाठी पारदर्शक आणि नियोजित कामकाजासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
04 Sep 2025 12:55 PM (IST)
ओबीसीच्या १२ मागण्या पूर्ण झाल्या आहेत अशी माहिती माध्यमांना सावे यांनी सांगतली आहे.
04 Sep 2025 12:45 PM (IST)
मंत्री अतुल सावे ओबीसींच्या उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही अडचण येणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलंय. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींना धक्का लागणार नाही, असं ते म्हणाले.
04 Sep 2025 12:35 PM (IST)
“ओबीसींच्या बारा मागण्या पूर्ण करण्यात येणार. महाज्योतीच्या माध्यमातून अभ्यासिका सुरू करणार. ओबीसी आणि मराठ्यांना न्याय देण्याचं काम फडणवीसांनी केलं. सरकार ओबीसींच्या पूर्णपणे पाठिशी असून विनंतीला मान देऊन उपोषण सोडा,” असं आवाहन अतुल सावेंनी केलं.
04 Sep 2025 12:25 PM (IST)
कुणी कितीही समित्या बनविल्या तरी आरक्षण मिळणार, असा ठाम विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. जी.आर बनविण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे जरांगे म्हणाले.
04 Sep 2025 12:15 PM (IST)
मराठा आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु असताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी त्याला विरोध केला आहे. त्यांनी मंत्रिमंडळाचा बैठकीला हजर न राहता अप्रत्यक्षपणे या निर्णयाचा निषेध केला आहै. सध्या राज्यात ओबीसी-मराठा आरक्षण मुद्या पेटला आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
04 Sep 2025 12:10 PM (IST)
भाजपकडून नांदेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाचे श्रेय देणारा यावर मजकूर लिहिलेला आहे.'नेता शब्द पाळणारा' असा फडणवीसांचा उल्लेख करण्यात आला आहे. फडणवीसांसोबत मनोज जरांगेंचाही फोटो लावला आहे.
04 Sep 2025 12:02 PM (IST)
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागत आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणाऱ्या असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार आज मुंबई पुण्यासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा- विदर्भात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत
04 Sep 2025 11:55 AM (IST)
राज्य सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सहा मागण्या मान्य केल्यामुळे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता ओबीसीच्या मुद्द्यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केला आहे.
04 Sep 2025 11:50 AM (IST)
नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात १ कामगाराचा मृत्यू झाला असून १७ कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या भीषण घटनेबाबत आपण जाणून घेऊ या. स्फोटातील सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले
04 Sep 2025 11:40 AM (IST)
खासदार नारायण राणे यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. याबाबत रोहित पवारांनी पोस्ट करत लिहिले आहे की, ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेब यांना जसलोक रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजली. राणे साहेब तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
04 Sep 2025 11:32 AM (IST)
राज्यामध्ये गणेशोत्सावाचा मोठा उत्साह असून राजकीय नेते देखील यामध्ये सहभागी होत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली.
04 Sep 2025 11:19 AM (IST)
मराठा आरक्षणाबाबत जीआर काढल्यामुळे ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला जाणे देखील टाळले. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्या सहा मागण्या मान्य केल्यामुळे नाराजी उघड केली होती. यानंतर आता त्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
04 Sep 2025 11:11 AM (IST)
श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला आणि त्यांनी भक्ती आणि द्वैत तत्त्वज्ञानावर आधारित कृष्णधर्माची स्थापना केली. मराठी भाषेला देववाणीचा दर्जा देऊन, सर्वसामान्य लोकांमध्ये धर्मप्रसार केला आणि त्यांना मोक्षमार्ग खुला करून दिला. त्यांनी लिहिलेले लीळाचरित्र हे आजही पुजनीय मानले जात असून त्यातील कथा या अत्यंत लोकप्रिय आहेत.
04 Sep 2025 11:10 AM (IST)
राजकीय वर्तुळातून मोठी अपडेट समोर आली आहे. भाजप नेते व खासदार नारायण राणे हे उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. खासदार राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयामध्ये तातडीने दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, नारायण राणे यांच्यावर तातडीने उपचार केले जाणार आहेत. मात्र नारायण राणे यांच्यावर कोणती शस्त्रक्रिया होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
04 Sep 2025 10:53 AM (IST)
अर्थमंत्र्यांनी जीएसटी सुधारणांबाबत केलेल्या घोषणेनंतर आज शेअर बाजार प्रचंड वाढताना दिसत आहे. गुरुवारी भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सकारात्मक ट्रेंडसह उघडले. बीएसईच्या ३० शेअर्सचा निर्देशांक ८१४५६ वर उघडला आणि ८८८ अंकांनी वाढला. तर निफ्टी देखील २६५ अंकांच्या वाढीसह २४९८० वर व्यवहार करताना दिसला.
04 Sep 2025 10:43 AM (IST)
टेलिव्हिजन अभिनेता आशिष कपूरला दिल्ली पोलिसांनी पुण्यातून अटक केली असल्याचे समजले आहे. गेल्या ऑगस्टमध्ये दिल्लीत आशिष कपूरविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑगस्टच्या सुरुवातीला दिल्लीत एका घरगुती पार्टीदरम्यान अभिनेता आशिष कपूरने एका महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला गेला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून, पोलिस वेगवेगळ्या ठिकाणी आरोपी टीव्ही अभिनेत्याचा शोध घेत आहेत आहेत. तपास पथकाने गोव्यापर्यंत आशिष कपूरचा पाठलाग केला. नंतर, त्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
04 Sep 2025 10:32 AM (IST)
जीवन विमा घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जीएसटी कौन्सिलने त्यांच्या ५६ व्या बैठकीत निर्णय घेतला आहे की आता जीवन विमा प्रीमियमवर कोणताही जीएसटी लागणार नाही. हा नियम २२ सप्टेंबर २०२५ पासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होईल. पूर्वी जीवन विमा प्रीमियमवर १८% जीएसटी आकारला जात होता, परंतु आता तो पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
04 Sep 2025 10:10 AM (IST)
तान्याने राष्ट्रीय टेलिव्हिजनवर ब्रेकअपचे कारणही सांगितले. तथापि, तान्याने कोणाचेही नाव न घेता तिच्या माजी प्रियकराबद्दल बोलले. त्याच वेळी, बिग बॉसच्या घराबाहेर, युट्यूबर बलराज सिंहने तान्याचा बॉयफ्रेंड असल्याचा दावा करून तान्याचा पर्दाफाश केला आहे. चला जाणून घेऊया बलराज कोण आहे आणि बिग बॉसच्या घरात तान्याने त्याच्याबद्दल काय म्हटले? बातमी सविस्तर वाचा...
04 Sep 2025 10:00 AM (IST)
बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर वारंवार गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. कारण बीड जिल्ह्यातून वारंवार हत्या, अपहरण, लैंगिक अत्याचार, गावठी शास्त्रांचा वापर आणि किरकोळ कारणांवरून होणाऱ्या मारहाणीच्या घटना समोर येत आहे. आता एका तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा एकदा हादरले आहे. बीड शहरातील स्वराज्य नगर भागात चाकूने हल्ला करून एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मित्रानेच किरकोळ वाद झाला असून मित्रानेच धारदार शास्त्राने हत्या केली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून बड्या शिताफीने अवघ्या काही तासात अटक केली आहे.
04 Sep 2025 09:50 AM (IST)
३ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ५:००: मलेशिया विरुद्ध चीन
३ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ७:३०: भारत विरुद्ध दक्षिण कोरिया
४ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ५:००: दक्षिण कोरिया विरुद्ध चीन
४ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ७:३०: मलेशिया विरुद्ध भारत ६
सप्टेंबर २०२५ सायंकाळी ५:००: दक्षिण कोरिया विरुद्ध मलेशिया
६ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ७:३०: भारत विरुद्ध चीन
७ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ५:००: (तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी): संघ ३ विरुद्ध संघ ४
७ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ७:३०: (अंतिम): संघ १ विरुद्ध संघ २
04 Sep 2025 09:40 AM (IST)
नांदेडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन परत जात होती तेव्हा हा अपघात घडला. भोकर तालुक्यातील नांदा म्है.प. येथील शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. मयत सर्व तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन येथील रहिवासी आहे. ही घटना बुधवारी घडली असून ही अपघाताची दुसरी घटना आहे.
04 Sep 2025 09:30 AM (IST)
गणपती विसर्जनाचा आत्मा असणारे ढोल ताशा पथक नेहमीच आपल्या ठेक्याने मिरवणूक गाजवत असतात. याही वर्षी ही पथके आपल्या सादरीकरणाने मिरवणूक गाजवण्यासाठी सज्ज झाली आहेत. पारंपरिक, सामाजिक, सांस्कृतिक विषयांना घेऊन हे वादन असणार आहे. तसेच यंदा नवीन काय ऐकायला मिळणार याचीही उत्सुकता मिरवणुकीच्या आधीच सर्वांना लागली आहे.
04 Sep 2025 09:30 AM (IST)
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ समोर येत असतात. काही व्हिडीओ माहितीपूर्ण असतात तर काही अगदी मनोरंजनासाठी बनवलेले असतात. प्रेक्षकांना हसवणारे, गोंधळवणारे किंवा विचार करायला लावणारे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच प्रकारचा एक मजेशीर व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये तरुणी लोकांना मजेशीर आणि कोड्यात पडणारे प्रश्न विचारताना दिसून येत आहे ज्यांची उत्तरे इतकी मिश्किल आहेत की ऐकून सर्वांनाच हसू अनावर होतं. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
04 Sep 2025 09:16 AM (IST)
नांदेडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन जाताना हा अपघात घडला. भोकर तालुक्यातील नांदा म्है. प. येथील शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. मयत सर्व तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन येथील रहिवासी आहे. ही घटना बुधवारी घडली असून ही अपघाताची दुसरी घटना आहे.
04 Sep 2025 08:59 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. त्यातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले आहेत. यानंतर महाराष्ट्रातही पडसाद उमटले आहेत. असे असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशात मुदतपूर्व निवडणुका लागणार असल्याचे मोठं विधान केलं आहे.
Marathi Breaking News Updates : राज्यातील काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होत आहे. असे असताना नागपुरात सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. बुधवारी शहराच्या काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. मात्र, आता नागपुरातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने 8 सप्टेंबरपर्यंत शहराचे हवामान असेच राहील असे संकेत दिले आहेत. 3 ते 5 सप्टेंबरपर्यंत हवामान सामान्यतः ढगाळ राहील. हलका पाऊस किंवा सरी पडण्याची शक्यता आहे. तर 6 ते 8 सप्टेंबरपर्यंत दररोज 1-2 हलक्या सरींची शक्यता आहे. या काळात शहराचे कमाल तापमान 30-31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23-24 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले.