Top Marathi News Today : कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे अनेक धरणे भरली; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर
Marathi Breaking Live Marathi Headlines : सध्या मौल्यवान धातूंवर देशांतर्गत विक्री आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा परिणाम झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे सणासुदीच्या आधी सोने आणि चांदीच्या किमतीत झालेली घसरण असू शकते. सोने आणि चांदीच्या किमतीत दररोज चढ-उतार होत असतात. १७ जुलै २०२५ रोजी सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत.
१७ जुलै रोजी, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९९,२७० रुपये झाली आहे. काल, म्हणजे १६ जुलै रोजी, हीच किंमत प्रति १० ग्रॅम ९९,७६० रुपये होती. त्याच वेळी, आज २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,९९० रुपये झाली आहे आणि १८ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ७४,४५० रुपये झाली आहे.
17 Jul 2025 07:28 PM (IST)
मुंबई: सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. तर विधिमंडळ परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले आहेत. यावर आता गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार गोपीचंद पडळकर या घटनेवर काय बोलले आहेत ते, जाणून घेऊयात.
17 Jul 2025 07:08 PM (IST)
मुंबई: सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. तर विधिमंडळ परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले आहेत. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. या प्रकरणाचा तातडीने अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
17 Jul 2025 05:49 PM (IST)
जून २०२५ मध्ये, सक्रिय म्युच्युअल फंड योजनांची जोरदार खरेदी पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार, ती सुमारे ₹४४,९०० कोटी होती. त्याच वेळी, इक्विटी-आधारित योजनांमध्ये (हायब्रिडसह) एकूण गुंतवणूक सुमारे ₹३०,००० कोटी होती. ही जोरदार खरेदी मिड-कॅप स्टॉकमुळे झाली. इतक्या मोठ्या खरेदीमुळे, म्युच्युअल फंडांच्या सक्रिय योजनांसह रोख रक्कम फक्त ५.३% पर्यंत कमी झाली, जी या वर्षी आतापर्यंतची सर्वात कमी रोख स्थिती आहे. ही रोख रक्कम सुमारे ₹१.७८ लाख कोटी होती.
17 Jul 2025 05:20 PM (IST)
आशियाई बाजारातील संमिश्र ट्रेंडमध्ये गुरुवारी (१७ जुलै) भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. आयटी कंपन्यांच्या एप्रिल-जून तिमाहीतील निकाल अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला. यामुळे आज आयटी शेअर्स ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तसेच, भारत-अमेरिका व्यापार करारावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिप्पण्यांमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या कार्यकाळातील अनिश्चिततेमुळे बाजारातील भावनांवर परिणाम झाला.
17 Jul 2025 05:02 PM (IST)
अल्पवयीन मुलांकडून गंभीर गुन्हे घडत असतानाच एका पंधरा वर्षाच्या मुलाने तेरा वर्षाच्या मुलीला ‘प्रपोज’ केले. पण, तिने नकार दिल्यानंतर त्या मुलाने थेट खुनाची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, त्याने तिच्यासोबत गैरवर्तनही केले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मुंढवा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे २०२५ पासून घडत असून, १३ वर्षीय मुलीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
17 Jul 2025 04:55 PM (IST)
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हरियाणातील शिकोहपूर येथील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वड्रा यांच्याविरोधत आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांच्यासोबतच इतर अनेक लोक आणि कंपन्यांची नावेही त्यात समाविष्ट आहेत. हे प्रकरण सप्टेंबर २०१८ चे आहे, जेव्हा रॉबर्ट वड्रा, हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा, रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ आणि एका प्रॉपर्टी डीलरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआरमध्ये भ्रष्टाचार, बनावटगिरी आणि फसवणूकीचे आरोप करण्यात आले आहेत.
17 Jul 2025 04:38 PM (IST)
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ युद्ध सुरु आहे. यामध्ये रशिया युक्रेनवर गेल्या काही दिवसांपासून सतत हल्ले करत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाने युक्रेनसोबत एक मोठा करार केल्याचा दावा केला आहे. रशियाच्या द मॉस्को टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने मृत युक्रेनियन सैन्यांच शव परत केले आहे.
17 Jul 2025 04:13 PM (IST)
लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या वर्षाअखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे बिहारमधील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बिहारमध्ये आता नागरिकांना वीज मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री नितिश कुमारांनी केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये १२५ युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. याआधी बिहार सरकारने मोफत वीज देण्याच्या बातम्यांना नाकारले होते. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. मध्यमवर्ग आणि ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी घेतल्याचे म्हटले जात आहे.
17 Jul 2025 04:05 PM (IST)
मोखाडा तालुक्यातील पुलाचीवाडी परिसरामध्ये सध्या बिबट्याचा आणि त्याच्या बछड्यांचा मुक्तपणे वावर दिसून येत आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेमध्ये, शेतकरी विनायक दोधाड यांनी आपल्या घरातून मोबाईल कॅमेर्याच्या सहाय्याने दोन बिबट्याच्या बछड्यांचा व्हिडिओ कैद केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
17 Jul 2025 04:02 PM (IST)
Indigo Flight Emergency Landing: मुंबई एअरपोर्टवर इंडिगोच्या फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. दिल्लीवरून गोव्याला जाणारे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. दिल्ली-गोवा फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आले आहे. फ्लाईटने टेकऑफ केल्यानंतर बराच कालावधी विमान आकाशात घिरट्या घालत होते. मात्र पायलटच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
17 Jul 2025 03:56 PM (IST)
मुंबई एअरपोर्टवर इंडिगोच्या फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. दिल्लीवरून गोव्याला जाणारे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. दिल्ली-गोवा फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आले आहे. फ्लाईटने टेकऑफ केल्यानंतर बराच कालावधी विमान आकाशात घिरट्या घालत होते. मात्र पायलटच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
17 Jul 2025 03:50 PM (IST)
ग्लोबल सुपर लीग २०२५ वेस्ट इंडिजच्या भूमीवर आयोजित केली जात आहे. स्पर्धेतील ९ व्या सामन्यात गयाना अमेझॉन वॉरियर्सची होबार्ट हरिकेन्सशी टक्कर झाली. गयानाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि संपूर्ण होबार्ट संघाला फक्त १२५ धावांत गुंडाळले. तथापि, शिमरॉन हेटिमरने आपल्या तुफानी फलंदाजीने प्रत्यक्षात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हेटमायरने फक्त १० चेंडूत सामन्याची कहाणी पूर्णपणे बदलली. ३९० च्या स्ट्राईक रेटने खेळताना हेटिमरने विरोधी संघाच्या गोलंदाजी हल्ल्याला गोंधळात टाकले. कॅरिबियन फलंदाजाने एका षटकात पाच षटकारही मारले.
17 Jul 2025 03:45 PM (IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील 3 सामने खेळले गेले असून यामध्ये इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला 22 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात टीम इंडिया आणि इंग्लंडमधील बरीच आक्रमकता दिसून आली. आहे. त्यामुळे कसोटी सामन्यांमध्ये उत्साह आहे. आता लॉर्ड्सवर खेळलेल्या सामन्यातील एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. खरंतर, इंग्लंडच्या संघाकडून जसप्रीत बुमराहविरुद्ध एक भयानक योजना आखण्यात आली होती. या योजनेत कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचा माईंड होता. यामध्ये बुमराहला दुखापत करून सामना जिंकण्याची ही योजना आखण्यात आली होती. ही योजना माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने उघड केली आहे. लॉर्ड्स कसोटीत फलंदाजी करताना बुमराह रवींद्र जडेजाला चांगली साथ देत होता.
17 Jul 2025 03:31 PM (IST)
गुजरातमधील अहमदाबाद येथे अपघात झालेल्या एअर इंडिया विमानाच्या दोन्ही वैमानिकांच्या शेवटच्या संभाषणाच्या कॉकपिट रेकॉर्डिंगवरून असे दिसून येते की कॅप्टनने विमानाच्या इंजिनचे इंधन बंद केले होते. ही माहिती अमेरिकन मीडिया वॉल स्ट्रीट जर्नलने दिली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात म्हटले आहे की बोईंग ७८७ ड्रीमलायनर उडवणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्याने अधिक अनुभवी कॅप्टनला विचारले की धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच स्विच कटऑफ स्थितीत का ठेवला. अहवालानुसार, यानंतर पहिल्या अधिकाऱ्याने घाबरून जाण्याची भावना व्यक्त केली, तर कॅप्टन शांत राहिला.
17 Jul 2025 03:19 PM (IST)
भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-२० मध्ये इंग्लंडला धूळ चारल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ आता एकदिवसीय मालिकेतही तोच कित्ता गिरवायला सुरवात केली आहे. इंग्लड आणि भारत यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. पहिला सामना साउथहॅम्प्टन येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला आहे. भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
17 Jul 2025 03:10 PM (IST)
राज्यातील परिचारिका संघटनांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात धरणे आंदोलनाचे आयोजन केले असून, सरकारने त्वरित योग्य तो प्रतिसाद न दिल्यास येत्या १८ जुलै २०२५ पासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर शहरातील भीमसेन जोशी रुग्णालय, भाईंदर पश्चिम येथे परिचारिका आणि नर्सेसनी दोन दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर परिचारिकांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
17 Jul 2025 03:02 PM (IST)
मिठी नदीततला गाळ कोण काढतोय, तर दिनो मोरिया. यांना गाळ काढायला मराठी माणूस दिसला नाही. तिथे यांना मोरे दिसला नाही. पण, दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होणार, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता इशारा दिला आहे. कोविड महामारित खिचडी चोरणारे, डेडबॉडी चोरणारे आमच्यावर आरोप करत आहेत. कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय?,असा सवालही त्यांनी यावेळी केला.
17 Jul 2025 02:56 PM (IST)
राज्यातील परिचारिका संघटनांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात धरणे आंदोलनाचे आयोजन केले असून, सरकारने त्वरित योग्य तो प्रतिसाद न दिल्यास येत्या १८ जुलै २०२५ पासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर शहरातील भीमसेन जोशी रुग्णालय, भाईंदर पश्चिम येथे परिचारिका आणि नर्सेसनी दोन दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर परिचारिकांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
17 Jul 2025 02:48 PM (IST)
स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’. 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. नवी दिल्ली येथे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान.
17 Jul 2025 02:31 PM (IST)
जितेंद्र आव्हाड यांना गलिच्छ शिव्या देणार मेसेज त्यांच्या मोबाईलवर आल्या. त्यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली. हा मेसेज मला आता विधानभवनात असतांना आला . महाराष्ट्रात काय सुरू आहे? अशी विचारणा त्यांनी केली.
17 Jul 2025 01:58 PM (IST)
भारताच्या संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडीया काही खेळाडूंना बाहेर करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भारताच्या संघासाठी हा सामना फारच महत्वाचा असणार आहे. टीम इंडीयाला या सामन्यात विजय मिळवणे किंवा ड्राॅ करणे गरजेचे आहे. भारताचा पुढील सामना हा 23 जुलैपासुन खेळवला जाणार आहे. भारताच्या फलंदाजांनी शेवटच्या इंनिगमध्ये फारच निराशाजनक कामगिरी केली. भारताच्या प्लेइंग ११ मध्ये टीम इंडीया चौथ्या सामन्यामध्ये कोणते बदल करणार हे तर वेळ आल्यावरच कळेल.
17 Jul 2025 01:50 PM (IST)
भारत आणि कुवेत यांच्यातील द्विपक्षीय हवाई सेवा करारात मोठी वाढ करण्यात आली असून, आता दर आठवड्याला ५० टक्क्यांनी जास्त जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे भारत आणि कुवेतमधील हवाई वाहतुकीला प्रचंड गती मिळणार आहे आणि प्रवाशांसाठी अधिक सोयीच्या उड्डाणांची सुविधा निर्माण होणार आहे.२००७ नंतर प्रथमच कुवेतला मोठ्या प्रमाणात उड्डाण जागा मिळाल्या आहेत. यापूर्वी आठवड्याला दोन्ही देशांना एकूण १२,००० प्रवासी जागांचा वापर करता येत होता. आता या संख्येत ५०% वाढ होऊन ती १८,००० वर पोहोचली आहे.
17 Jul 2025 01:42 PM (IST)
आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी 10 कोटी 84 लाख रुपयांचे दान अर्पण केले. तसेच सोने-चांदीचे दागिने अर्पण केले असून, मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या.
17 Jul 2025 01:35 PM (IST)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडावे, असे म्हटले आहे.
17 Jul 2025 01:25 PM (IST)
एक दिवसाच्या काम बंद आंदोलनातून मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यभरातील परिचारिका आक्रमक… राज्य सरकारच्या सर्व रुग्णालयातील तब्बल 35 हजार परिचारिका या काम बंद आंदोलनात सहभागी होणार… हसन मुश्रीफ यांच्यासोबतची चर्चा असफल ठरल्याने कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.
17 Jul 2025 01:15 PM (IST)
नुकताच पारित झालेल्या जनसुरक्षा कायदा विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसने आंदोलन केलंय. जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली. यावेळी महायुती सरकार विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली.
17 Jul 2025 01:05 PM (IST)
मंत्रिमंडळात पाच मंत्री माजी रिक्षा चालक आहेत, तरीदेखील रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार रिक्षा चालक संघटनेचे केशव क्षीरसागर यांनी केली. राज्यभर सुरू असलेल्या कॅब चालकांच्या आंदोलनात आता रिक्षा संघटनाही उतरली आहे. आजपासून राज्यातील रिक्षा संघटना संपावर जाणार आहे. सरकारी दरानुसार दर मिळावं यासाठी आणि ओला, उबेर, रॅपिडो बाईकच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे.
17 Jul 2025 12:55 PM (IST)
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्याचा मन हेलावणारा प्रकार घडला आहे. एक महिला आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवत असून देखील पोलिस प्रशासन अजगरासारखे झोपा काढत असेल तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार ? राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब बीडमध्ये सुरु असलेले अराजक कोणाच्या आशीर्वादानं सुरु आहे ! बीडच्या कायदा सुव्यवस्थेला कुणी वाली आहे की नाही ?
17 Jul 2025 12:50 PM (IST)
महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. नाशिक मध्ये आदिवासी आयुक्तालयासमोर आठ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यातील काही आंदोलकांनी आज ठाकरे यांची भेट घेतली व त्यांची समस्या मांडली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन न्याय मिळवून देऊ असं आश्वासित केल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.
17 Jul 2025 12:42 PM (IST)
महादेव मुंडे हत्या प्रकरणी विजयसिंह बांगर यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारणा करण्यात आली असता भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
17 Jul 2025 12:27 PM (IST)
आज सकाळी शेअर बाजार तेजीत उघडला, मात्र चांगल्या सुरुवातीनंतर, शेअर बाजार पुन्हा एकदा घसरला आहे. बीएसईचा ३० शेअर्सचा बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स, ११९ अंकांनी वाढून ८२७५३ वर उघडला, परंतु आता ७७ अंकांनी घसरून ८२५५६ वर आहे. दुसरीकडे, एनएसईचा ५० शेअर्सचा बेंचमार्क निर्देशांक, निफ्टी, १८ अंकांनी वाढीसह २५२३० वर उघडला आणि आता २२ अंकांनी घसरून २५१८९ वर व्यवहार करत आहे.
17 Jul 2025 12:23 PM (IST)
नाशिकमध्ये दिंडोरी- वणी रोडवर मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. अल्टो कार आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने कार रस्त्याशेजारील नाल्यात उलटली. कार नाल्यात उलटल्यानंतर प्रवाशांच्या नाका तोंडात पाणी गेलं. यामुळे सर्वजण गुदमरले. यातच ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मोटारसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
17 Jul 2025 12:06 PM (IST)
विधीमंडळाच्या आवारामध्ये झालेल्या आमदारांच्या फोटोशूटवेळी उद्धव ठाकरेंनी टाळलेली एकनाथ शिंदे यांच्या शेजारील जागा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबत केलेला संवाद याची राज्यभर चर्चा आहे. यावर अतुल लोंढे यांनी उपहासात्मक टीका केली आहे.
🔴 Breaking News
मंत्रीमंडळातील खुर्च्यांची ‘musical chairs’ सुरू झाली आहे!🎵 शिंदे-अजित गटातील काही Out of Tune
⏸️ भाजपचे काही ‘Pause’ मोडमध्ये
▶️ इतर पक्षातून आलेले ‘Play’ वरलाडके आणि बोलके भाऊ लवकरच नावडते आणि अबोल होणार…
मित्रांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याशिवाय…— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) July 17, 2025
17 Jul 2025 12:03 PM (IST)
बिहार राज्य सरकारकडून पोलिसांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांना वर्दीवर मेकअप आणि रिल्स काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
17 Jul 2025 11:44 AM (IST)
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारवासियांना मोठे गिफ्ट दिले आहे. येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. यामुळे बिहारमधील सामान्यांच्या घरांमध्ये आनंददायी वातावरण आहे.
17 Jul 2025 11:27 AM (IST)
UK संसदेच्या इतिहासात प्रथम संसदेमध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भेटीदरम्यान हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी अधिकारी आणि इतर कायदेकर्त्यांनी भक्तीभावाने सहभाग घेतला.
17 Jul 2025 11:10 AM (IST)
उत्तर प्रदेशमधील धर्मगुरु छांगूर बाबा यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. छांगूर बाबा यांच्या संबंधित 14 ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. यामध्ये मुंबईचा देखील समावेश असून जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याचा आरोप छांगूर बाबा यांच्यावर करण्यात आला आहे.
17 Jul 2025 11:08 AM (IST)
विधीमंडळाच्या आवारामध्ये नेत्यांचे फोटोशूट सुरु होते. यावेळी पहिल्या रांगेमध्ये केवळ एकनाथ शिंदे यांच्या शेजारी असलेली जागा रिकामी होती. नंतर आलेल्या उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसणे टाळले. तसेच शिंदेंकडे पाठ करुन बसले. नीलम गोऱ्हे यांना एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसवून उद्धव ठाकरे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शेजारी बसले.
17 Jul 2025 11:05 AM (IST)
त्रिभाषा सूत्र यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. हिंदी लागू न करण्यावरुन ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र 100 टक्के लागू होणार असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
17 Jul 2025 10:48 AM (IST)
सलमान खानचे हे अपार्टमेंट मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील पॉश परिसरात आहे. त्याने ते ५.३५ कोटी रुपयांना विकले आहे. हे अपार्टमेंट शिव अस्थान हाइट्समध्ये आहे आणि १,३१८ चौरस फूट जागेत पसरलेले आहे. त्यात तीन पार्किंग स्पॉट्स देखील आहेत. सलमान सध्या जिथे राहतो तो गॅलेक्सी अपार्टमेंट त्यापासून २.२ किलोमीटर अंतरावर आहे
17 Jul 2025 10:47 AM (IST)
१७ जुलै २०२५ रोजी सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत. सण आणि लग्नाच्या हंगामापूर्वी गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी ही एक महत्त्वाची माहिती आहे, सोने आणि चांदीचे नवीनतम दर काय आहेत ते आपण आजच्या या बातमीतून जाणून घेऊया
17 Jul 2025 09:25 AM (IST)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा विकेटकीपर जितेश शर्मा याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जितेश शर्मा हा सध्या इंग्लंडमध्ये आहे. तो सध्या इंग्लंडमध्ये फिरत आहे. लॉर्ड्स मैदानावर चालू सामन्याच्या वेळचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये सामना चालू होत असताना त्याला आतमध्ये जायचे होते त्यावेळी पण त्याला लगेचच सिक्युरिटी गार्डन थांबवले आणि आत मध्ये जाण्यास नकार दिला. बातमी सविस्तर वाचा
17 Jul 2025 09:17 AM (IST)
अकोल्यातील पोलिसांनी एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ३० हजार रुपयांचं एमडी ड्रग्स (46.30 ग्रॅम) जप्त करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक बीएएमएस दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तर फरार आरोपी ‘गब्बर जमादार’ हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे आणि पोलीस मित्र असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई गौरक्षण रोड परिसरात खदान पोलिसांनी केली आहे.
17 Jul 2025 09:10 AM (IST)
महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहेत. नवीन टॅरिफनुसार सध्या महाराष्ट्राचा दर ₹८.३२ आहे, जो पुढील टप्प्यात ₹७.३८ रुपयांवर येणार आहे. तुलनेत, तमिळनाडूचा दर ₹९.०४, गुजरात ₹८.९८ आणि कर्नाटक ₹७.७५ रुपये इतका आहे. पुढील काही वर्षांत महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर कमी राहील. तसेच टॅरिफ ट्रू-अप प्रक्रियेमुळे दर वाढणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.
17 Jul 2025 09:08 AM (IST)
अनेक ठिकाणी भूकंपामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यूही झाला आहे. भूकंपाच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. असे असताना आता अमेरिकेतील अलास्का येथे शक्तिशाली भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७.३ इतकी मोजण्यात आली. यामध्ये मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.