चंद्रभागा नदीत युवकाचा मृत्यू (फोटो- istockphoto)
पंढरपूर: आषाढी वारीनिमित संपूर्ण राज्यात आणि पंढरीमध्ये एकच उत्साह आहे. सर्व वारकरी विठ्ठालाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघाले आहेत. मात्र पंढरपूरमधून एक वाईट बातमी समोर येत आहे. चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये एकच हळहल व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय तरुण आपल्या मित्रांसह पांडुरंगाच्या दर्शनाला आला होता. दरम्यान आज सकाळी तो पुंडलीक मंदिराजवळ चंद्रभागा नदीत अंघोळीसाठी गेल्याचे समजते आहे. मात्र आंघोळ करत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नसावा, त्यामुळे तो बुडून मृत्युमुखी पडला असण्याची शक्यता आहे.
या घटनेची माहिती प्रशासनाला आणि पोलिसांना मिळताच तातडीने चंद्रभागा नदीत शोधकार्य राबवण्यात आले. काही तासांच्या प्रयत्नांतर त्या युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. मात्र प्रशासन संपूर्णपणे सज्ज असताना अशी घटना घडल्याचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आषाढी वारीसाठी चंद्रभागेत पाणी सोडणार
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीत पाणी सोडले जाणार आहे. उजणी धरणातून हे पाणी सोडले जाणार आहे. वारकऱ्यांसाठी उजनीतून हे पाणी सोडले जाणार आहे. चंद्रभागेत स्नान करणे हे पवित्र समजले जाते. त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यामध्ये पालखीच्या आगमनाची तयारी पूर्ण; अग्निशमन दलाकडून माऊलींच्या पालखीत जवान तैनात
पुण्यामध्ये पालखीच्या आगमनाची तयारी पूर्ण
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यनगरीत आगमन होत आहे. यासाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. पुणे पोलीस आणि प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येत वारकरी संप्रदाय सहभागी शहरामध्ये दाखल होत असतो. या अनुषंगाने पालखी सोहळ्यामध्ये आग वा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतीकरिता अग्निशमन दलाकडून दरवर्षी अग्निशमन वाहन पुणे ते पंढरपूर तैनात करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यासाठी अग्निशमन दल देखील तयार झाले आहे.
Pune Palkhi 2025 : पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल
जड वाहनांना या चौकांपासून प्रवेश बंद